मनसे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी मैदानात, पहा कोणत्या शेतकर्‍यांना मिळणार मदत..!

शेअर करा

शेतकरी आधी उशिराच्या पावसाने चिंतीत झाला होता आणि आता अति वृष्टीने घायाळ आहे. उशिरा हजेरी लावलेल्या वरून राजाने सध्या संपूर्ण राज्यात थैमान घातले आहे. त्यातल्या त्यात विदर्भात(Vidharbh) पाऊस जास्त प्रमाणात पडत आहे. विदर्भातील बऱ्याच जिल्यांमध्ये पूर परिस्थिती(Flood situation) निर्माण झालेली आहे.

आधीच पेरणी उशिरा झाली त्यात पाऊस जास्त होत असल्यामुळे जे काही उगवले ते पाण्यात जाण्याची वेळ आली आहे.

शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ येते की काय अशी शंका आहे. बर्‍याच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. अजून देखील राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागू शकते अशी परिस्थिती आहे. शेतकरी सध्या निसर्गाच्या लहरीपणाच्या तडाख्यात सापडत आहे.

असे असताना कुणी तरी मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात(Helping hand) देत असेल तर नक्कीच शेतकरी आनंदी(Happy) होईल.

हो मदतीचा हात पुढे केला आहे राज ठाकरेंच्या(Raj Thackray) यवतमाळ जिल्यातील मनसे पक्षाने.. विधानसभे मध्ये एकच आमदार असलेल्या मनसे पक्षाने पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्या नावाने यवतमाळ जिल्यात शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केली आहे.

महत्वाचं म्हणजे ही योजना यवतमाळ जिल्ह्यासाठीच आहे. ही योजना यवतमाळ जिल्ह्यातील मनसेचे नेते व कार्यकर्ते मिळून यांनी सुरू केली आहे..

या योजनेचे नाव आहे “राजसाहेब ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना”. या योजनेचा जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होईल असे सांगण्यात येत आहे. या योजनेमुळे अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे.

काय आहे योजना?

दरवर्षी शेतकऱ्याचे आर्थिक गणित तोट्यातच चालू असते. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे शेतकऱ्यांनी बँकांमधून कर्ज घेऊन पेरणी केली आहे. अलीकडेच अति झालेल्या पावसाने बऱ्याच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना आता आर्थिक फटका बसेल या आर्थिक नुकसाणीतून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील मनसेने ही योजना सुरु केली आहे.

जिल्ह्यातील वणी, मारेगाव आणि झरीजामनी या तालुक्यातील 600 शेतकऱ्यांना रब्बी हंगामात खत, बी-बियाणे यांची मदत या योजनेच्या माध्यमातून केली जाणार आहे. वरील सर्व साहित्य शेतकऱ्यांना मनसे घरपोच देणार आहे, असे बोलले जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published.