खुशखबर! 594 घरकुलांना मान्यता; मोदी आवासला झाली सुरुवात, पहा कामाची बातमी..!

Modi Aawas Gharkul Yojana : सरकार सामान्य लोकांसाठी अनेक योजना आणत असते. त्यात महत्वाची योजना म्हणजे घरकूल योजना. कारण प्रत्येकाला दर्जेदार जीवन जगण्यासाठी एक पक्के घर असणे आवश्यक असते. हक्काचे व पक्के घर नसेल तर त्या व्यक्तीला खूप समस्यांचा सामना करावा लागतो. अलीकडेच जिल्ह्यात मोदी आवास घरकुल योजनेला सुरुवात झाली आहे आणि 2023-24 या वर्षामध्ये 1 हजार 777 एवढ्या घरांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. त्यामधील 584 एवढ्या प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे. या घरकूलांचा लाभ कोणत्या जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार? आणि कोणत्या तालुक्यासाठी किती घरकूलं मंजूर झाली? याची माहिती आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.

Government Housing Scheme

मोदी आवास घरकुल योजना (Modi Aawas Gharkul Yojana) राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे. या आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागामधील इतर मागास आणि विशेष मागास प्रवर्गामधील घर नसलेल्या किंवा कच्चे घर असलेल्या कुटुंबांना या घरकुल योजनेचा (Gharkul Yojana) लाभ देण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून किमान 269 चाैरस फूट चटई क्षेत्रफळ एवढ्या जागेत पक्के घर बांधण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये एवढे अनुदान लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यामध्ये बांधकाम सुरू झाल्यानंतर चार टप्प्यामध्ये देण्यात येत आहे.

अरे वा! याठिकाणी फ्लॅटचे दर फक्त 15 लाखांपासून सुरू; येथे क्लिक करून पहा माहिती..

हा लाभ सातारा जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहे. सातारा जिल्ह्यास 2023-24 ते 25-26 या कालावधीकरिता इतर मागास प्रवर्गासाठी 5 हजार 618 घरकूल आणि विशेष मागास प्रवर्गासाठी 308 घरकुलांचे (Gharkul Yojana) उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. त्यामधील 2023-24 या वर्षासाठी 1 हजार 777 घरकुलाचे उद्दिष्ट मिळाले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मिळालेल्या 594 प्रस्तावांना मान्यता मिळालेली आहे. उर्वरित असलेल्या प्रस्तावांना प्राप्त होताच मान्यता दिली जाणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

पहिला टप्प्यात मंजूर घरकुले (Housing Scheme)

तालुका – मंजूर घरकुले : (1) सातारा 34, (2) कऱ्हाड 46, (3) महाबळेश्वर 17, (4) फलटण 63, (5) खंडाळा 65, (6) माण 175, (7) पाटण 41, (8) खटाव 60, (9) जावळी 48, (10) वाई 43

म्हाडा भाडे तत्वावर देणार फ्लॅट, गाळे; येथे क्लिक करून पहा कोणाला मिळणार लाभ?

Leave a Comment