बस स्टँड वर पळतांना दिसले मोदी? वाचा सत्य


आपल्याला सोशल मीडिया वर नेहमीच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळत असतात. यामध्ये दोन प्रकारचे व्हिडिओ असतात. एक म्हणजे सहज बनलेले ओरिजिनल व्हिडिओ तर दुसरे म्हणजे जाणूनबुजून मनोरंजनासाठी बनवलेले बनावटी व्हिडिओ. काही बनावटी व्हिडिओ तर असे असतात की त्यांच्या वर आपला विश्वास बसू लागतो. (Modi lookalike information in Marathi )

काही दिवसांपासून असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया वर खुप वेगाने फिरत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू रोखता येणार नाही. या व्हिडिओ मध्ये एक व्यक्ती बस स्टँड वर पळत असताना दिसत आहे. ही व्यक्ती काही साधारण व्यक्ती सारखी दिसत नाही तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं सारखी दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोशाखा सारखा पोशाख या व्यक्तीने घातलेला आहे. आणि विशेष म्हणजे दाडी व केसांचा पांढरा रंग तंतोतंत जुळणारा आहे. त्यामूळे हा व्हिडिओ खुपच व्हायरल होत आहे.(Modi lookalike information in Marathi )

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक दिवसाचा खर्च? जाणून घ्या रोचक माहिती

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तर तुम्ही म्हणाल की ही व्यक्ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहे पण तसे काहीच नाही. ही व्यक्ती नेमकी कोण आहे? आणि कुठली आहे? याबाबत अधिकची माहिती उपलब्ध नाही. पण या व्हिडिओ ने Whats App आणि Facebook वर नक्कीच धूमाकूळ घातलेला आहे.

यूपीच्या सहारनपुरचे अभिनंदन पाठक डुप्लिकेट मोदी म्हणून प्रसिद्ध (Duplicate Modi information in Marathi)

यूपीच्या सहारनपुरचे अभिनंदन पाठक हुबेहुब पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे दिसतात हे आपल्याला माहिती आहे. पाठक यांनी 2014 मध्ये नरेंद्र मोदींचा प्रचार केला होता पण लोक त्यांना “अच्छे दिन कब आएंगे?” असे विचारून त्यांची टिंगल उडवत असे. यासंबंधी त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिल्याची देखील माहिती आहे पण त्यांच्या पत्राला पंतप्रधानांकडून उत्तर मिळाले नव्हते. अच्छे दिन कब आएंगे?, माझ्या खात्यात 15 लाख कधी येणार? लोकांकडून सतत विचारल्या जाणाऱ्या अशा प्रश्नांमूळे त्यांनी काँग्रेस पक्ष जॉईन केला. 2014 मध्ये दिलेले काही अश्वासने पुर्ण करण्यामध्ये मोदी सरकार अपयशी ठरले आहे पण मी मोदींचा चाहता आहे. मोदींबद्दल माझ्या मनात नेहमी आदर राहील, असे पाठक म्हणतात.