E Shram Card : ‘या’ तारखेला बॅंक खात्यात मिळणार पैसे, जाणून घ्या ई-श्रम पोर्टल वर नोंदणी करण्याचे फायदे..!

ई-श्रम कार्ड योजना | E-Shram Card Yojana

केंद्र सरकार गोर गरिबांचं कल्याण करण्यावर विशेष भर देत आहे. वेगवेगळ्या योजना चालू करून त्या माध्यमातून शेतकरी वर्ग व मजूर वर्गाला आर्थिक सहकार्य करत आहे. अशीच एक योजना म्हणजे ई-श्रम कार्ड योजना. ही योजना देशातील असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या लोकांसाठी राबवण्यात येत आहे. ज्यांनी ई-श्रम पोर्टल वर नोंदणी केलेली आहे अशा नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत सरकार लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता हस्तांतरित करणार आहे.

हा हप्ता नेमका कधी येणार असा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा, या लेखामध्ये आपण ई-श्रम योजनेचा हप्ता केव्हा येणार आहे? ई-श्रम पोर्टल वर नोंदणी करण्याचे फायदे, ई-श्रम पोर्टल वर नोंदणीसाठी लागणारे कागद पत्रे आणि नोंदणी कुठे करावी? अशी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत (E-Shram Card Yojana)….

‘या’ तारखेला मिळणार ई-श्रम योजनेचा हप्ता | E-Shram Card Yojana Installment

ई-श्रम कार्ड योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 26 ऑगस्ट 2021 रोजी केलेली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत जवळपास 24 करोड मजुरांनी नोंदणी केली आहे. या योजनेचा लाभ म्हणून लाभार्थ्यांना सरकार दर महिन्याला आर्थिक मदत आणि 2 वर्षाचा विमा(insurance) सेवा पुरवत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1 हजार रूपयाचा लाभ मिळाला आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार आता सरकार लवकरच म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 500 रुपयांचा हप्ता हस्तांतरित करण्याची शक्यता आहे.

ई-श्रम पोर्टल वर नोंदणी केल्यानंतर मिळतील भरपूर फायदे | Benefits of Registration on E-Shram Portal

ई-श्रम पोर्टल वर असंघटीत क्षेत्रातील कामगार आणि श्रमिक यांची नोंद केली जाते. त्यांना एक 12 अंकी UAN नंबर (यूनिवर्सल अकाउंट नंबर) आणि कार्ड दिले जाते जे त्यांच्या आयुष्यभरासाठी उपयोगात येईल. या कार्डच्या माध्यमातून भविष्यात केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा या कामगारांना होणार आहे..

ई-श्रम पोर्टल वर नोंदणी केल्यानंतर लाभार्थ्याला मासिक(Monthly) आर्थिक लाभ मिळेल त्यासोबतच प्रधान मंत्री सुरक्षा बीमा योजनेअंतर्गत (PMSBY) 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळेल. या पोर्टल वर नोंदणी केलेल्या सर्व नागरिकांना भविष्यातील शासना मार्फत मिळणार्‍या सामाजिक सुरक्षेच्या सर्व योजनांचा लाभ मिळेल .

ई-श्रम पोर्टल वर नोंदणी साठी लागणारे कागद पत्रे

(1) आधार कार्ड
(2) आधारशी जोडला गेलेला मोबाईल नंबर
(3) बँक पासबुक

नोंदणी कुठे करावी?

आपण भारत सरकारच्या ई-श्रम पोर्टल वर जाऊन स्वतः किंवा जवळील CSC सेंटर ला भेट देऊन नोंदणी करू शकता .

शेतमालाचे बाजार भाव, हवामान अंदाज आणि सरकारी योजनांविषयी माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा..

Leave a Reply

Your email address will not be published.