महाराष्ट्रात मॉन्सून ‘या’ दिवशी; शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री दादाजी भुसे यांचा ‘हा’ सल्ला महत्वाचा, वाचा सविस्तर..!

शेतकरी बांधवांना आता मॉन्सूनची खूपच आतुरता लागली आहे. कधी आपण पेरणी करतो आणि कधी मोकळे होतो, असं शेतकरी बांधवांना वाटतय. पण पेरणी संदर्भात राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी शेतकर्‍यांना महत्वाचा सल्ला दिला आहे..(Monsoon in Maharashtra on this day; Agriculture Minister Dadaji Bhuse’s ‘this’ advice is important for farmers)..

राज्यातील जनता आता वाढलेल्या उष्णतेने त्रस्त झाली आहे, कधी एकदाचा वरून राजा बरसतो आणि आपली या उकाड्यातून सुटका होते असे जनतेला वाटत आहे. त्या सोबतच मृग नक्षत्राला सुरुवात झाल्याने आकाशात आता ढग दिसायला लागले आहे, म्हणून आता मान्सून येणार असे बळीराजाला पण वाटत आहे. पण अलीकडेच शेतकऱ्याला निराश करणारी बातमी हाती येत आहे, की मान्सून(mansoon) आता महाराष्ट्रात उशिरा दाखल होणार आहे.

भारतीय हवामान विभागामार्फत(IMD) दिलेल्या माहिती प्रमाणे, केरळ मध्ये 1 जून ला दाखल होणारा मान्सून(Mansoon) या वर्षी जरा लवकर म्हणजेच 29 मे लाच दाखल झाला होता. त्यामुळे मान्सून चे केरळ मधील आगमन पाहता मान्सून महाराष्ट्रातील दक्षिण कोकण भागात 3 जून ला हजेरी लावणार होता. मात्र मान्सून काहीसा मंदावला आहे. मान्सून ची वाटचाल ही अपेक्षे पेक्षा खूप संत गतीने होत आहे. मान्सून ची ही वाटचाल नक्कीच निराशा जनक आहे.

या दिवशी होणार मान्सून चे महाराष्ट्रात आगमन??

भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार मान्सून 12 जून नंतर महाराष्ट्रात दाखल होऊन, उकाड्यापासून परेशान असलेल्या नागरिकांना दिलासा देणार आहे. त्यामुळे या वर्षी मान्सून ने चांगलीच दांडी मारली असून जवळ जवळ जवळ दहा दिवस उशिरा मान्सून महाराष्ट्राला दर्शन देणार आहे. मात्र मान्सून च्या उशिरा होणाऱ्या आगमनाचा सर्वात जास्त फटका बळीराजाला बसणार आहे. कारण की शेतकरी खूप आतुरतेने वरून राजाची वाट पाहत आहे. त्यामुळे आलेल्या ताज्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन करावे.

तसेच, मान्सून ची एकंदरीतच कासवाच्या गतीने होणारी वाटचाल पाहता. पुणे वेधशाळेचे प्रमुख हवामान तज्ञ श्री अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, 2022 या वर्षातील महाराष्ट्रातील मान्सून चे आगमन येणाऱ्या 7 ते 10 दिवसात होणार. तरी सध्या मान्सून ने कर्नाटकातील काही भाग, तमिळनाडू, केरळ, अरब समुद्र आणि बंगालची खाडी इ. भागात हजेरी लावली आहे. असे त्यांनी सांगितले.

लवकरच वादळी पावसाचा तडाखा बसणार

भारतीय हवामान विभागा कडून मिळालेल्या माहिती नुसार येणाऱ्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रातील काही भागात वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामूळे शेतकरी बांधवांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.. मान्सून पूर्व पावसातच शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आवाहन शेती क्षेत्रातील तज्ञ मंडळी या वेळी शेतकऱ्यांना करत आहे…

तसेच, महाराष्ट्राचे कृषी मंत्री श्री दादाजी भुसे यांनी सुद्धा अलीकडेच शेतकऱ्यांना एक अतिशय मोलाचा सल्ला(advice) दिलेला आहे. शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची पेरणीची घाई करू नये. श्री भुसे यांच्या मते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी टाळावी. नाहीतर शेतकऱ्यांचे खूप नुकसान होईल आणि पुन्हा पेरणी करण्याची वेळ पण बळीराजवर येऊ शकते..

ताजे बाजार भाव, हवामान अंदाज आणि शेती विषयक सर्व माहितीसाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा…

Leave a Comment