संधी सोडू नका; मुंबईत घरांची मोठी लॉटरी, ही कागदपत्रे तयार ठेवा..!

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीची प्रतीक्षा करणार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. याचे कारण म्हणजे येत्या सप्टेंबर महिन्यात म्हाडा मुंबई मंडळ जवळजवळ 2 हजार घरांची लॉटरी (Mhada Lottery) आणण्याची योजना करत आहे.

मुंबई मंडळाची अंतिम लॉटरी मागील वर्षी जाहीर झाली होती आणि या लॉटरीत म्हाडाची 4082 घरे होती.  या घरांसाठी 1.22 लाख एवढ्या लोकांनी अर्ज केले होते. ज्यांना या लॉटरीत घर लागले नाही असे लोक म्हाडाच्या पुढील लॉटरीची प्रतीक्षा करत होते. म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील तयार असलेल्या घरांची माहिती गोळा करण्यात येत आहे. मुंबईतील जवळपास 2 हजार घरे पुढील काही दिवसात तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉटरीसाठी या घरांची निवड करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या घरांची लॉटरी सप्टेंबर महिन्यात काढली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. या आगामी मुंबई लॉटरीत (Mumbai Mhada Lottery) जर तुम्हाला म्हाडाचे घर घ्यायचे असेल तर त्यासाठी काही कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवावी लागणार आहे. चला जाणून घेऊया यासंदर्भात माहिती..

मुंबईत खिशाला परवडणारं घर घ्यायचंय? येथे क्लिक करून पहा स्वस्त भागांची यादी..!

म्हाडाच्या या पुढील लॉटरीत गोरेगावमधील (Goregaon) पंचतारांकित सुविधा असलेल्या इमारतीमधील जवळपास 332 एवढ्या घरांचा समावेश केला जाणार आहे. ही घरे मध्यम व उच्च गट या वर्गासाठी असणार आहेत. उच्च गटाची घरे जवळपास 979 चौरस फुटाची तर मध्यम गटाची घरे 714 चौरस फुटाची असणार आहेत. यातील मध्यम गटातील घरांची किंमत जवळपास 80 लाख तर उच्च गटातील घरांची किंमत जवळपास 1.25 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.

फक्त एवढे पैसे भरा आणि पुण्यात म्हाडाचा फ्लॅट घ्या; फक्त येथे करा एक कॉल..!

गोरेगावमध्ये असलेल्या इमारतीत पहिल्यांदाच म्हाडाकडून जिम, इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट आणि स्विमिंग पूल या सुविधा देण्यात येणार आहे. या घरांचे बांधकाम जवळपास 80 टक्के एवढे पूर्ण झाले आहे. पुढील 2 ते अडीच महिन्यात ही घरे तयार होणार आहे.

ही कागदपत्रे ठेवा तयार

मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे प्रतेक व्यक्तीचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक म्हाडाकडे अर्ज करतात. म्हाडाचे घर लॉटरीत मिळवण्यासाठी अर्जदाराकडे 7 कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ही सात कागदपत्रे पुढीलप्रमाणे – (1) आधार कार्ड, (2) पॅन कार्ड, (3) डोमिसाईल सर्टिफिकेट, (4) इन्कम सर्टिफिकेट, (5) शपथ पत्र, (6) जात प्रमाणपत्र आणि (7) आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्या वर्गाचे प्रमाणपत्र तयार ठेवून म्हाडाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करू शकता..

Leave a Comment