मुंबईत घरांचे कोणत्या भागात किती भाव? याठिकाणी घरांना सर्वाधिक मागणी, पहा एका क्लिक वर..!

मुंबईत घर घ्यायचे आहे, पण मुंबई शहरात घ्यावे की मुंबई जवळील उपनगरात? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. कोणत्या भागात किती किंमती आहे? याची माहितीही अनेकांना नसते. त्यामुळे तुम्ही जर मुंबईत घर (2 BHK Flats Mumbai) खरेदी करायचा विचार करत असाल तर आधी ही माहिती वाचून घ्या. या बातमीत आपण एका क्लिकवर शहरातील सध्याचे घरांचे दर (Housing Rates) बघणार आहोत.

मुंबई शहरात दररोज नवनवीन लोक येतात. काही शिक्षणासाठी येतात तर काही व्यवसायात आपले नशीब अजमावण्यासाठी येतात. त्यामुळे मुंबईचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत राहणार्‍या प्रत्येकाचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न असते. त्यासाठी कितीही पैसे मोजण्यासाठी मुंबईकर तयार असतात. कारण अलीकडे अनेक लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली पाहायला मिळते. त्यामुळे आता मुंबईत छोटे घर नको अशी मानसिकता निर्माण झालेली आहे. दहा बाय दहाच्या खोलीत राहणारा मुंबईकर सुद्धा आता 2 बीएचकेच्या घरात (2BHK Flat Mumbai) पोहोचला आहे.

काय सांगता! फक्त एवढी रक्कम भरून मिळेल म्हाडाचे घर; येथे क्लिक करून पहा बातमी..

मुंबईत कोणत्या भागात काय भाव?

मुंबई मुख्य शहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी घरांच्या वेगवेगळ्या किमती पाहायला मिळत आहेत. मुंबई मुख्य शहर आणि शहरातील मध्यवर्ती भागात साधारण 650 ते 700 चौरस फुट एवढ्या घराचे दर दीड कोटींपेक्षा जास्त आहेत. आणि पश्चिम उपनगरांत 2 बीएचके घराची किंमत 75 लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. पण पूर्व उपनगरांमध्ये मात्र घरांच्या किंमती कमी आहेत. पूर्व उपनगरांमध्ये घरांच्या किमती 55 लाख रुपयांपर्यंत आहेत. 

मुंबईत रेल्वे स्टेशनजवळ म्हाडाचे 2 BHK फ्लॅट खरेदी करता येणार; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

पश्चिम उपनगरांत घरांना जास्त मागणी

गेल्या वर्षी 2 बीएचके घरांना सर्वाधिक पसंती मिळाली. अलीकडे तर मुंबईतील अनेक पुनर्विकास प्रकल्पांमध्ये देखील विकासकांकडून 1RK आणि 1BHK ऐवजी 2BHK घरांना जास्त पसंती देण्यात येत आहे. शहरात सध्याच्या काळात पश्चिम उपनगरांत घरांच्या किमती जास्त असून येथील घरांना मागणीही चांगलीच असल्याचं दिसून येत आहे. 

मुंबईजवळ फक्त 13 लाखात घर; याठिकाणी परवडणारी घरे उपलब्ध, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment