मुंबईत म्हाडाचे स्वस्त घर घ्यायचे का? मुंबई म्हाडा लॉटरी बाबत महत्वाची माहिती आली समोर, येथे पहा एका क्लिकवर..!

मुंबईत म्हाडाचे घर (Mhada Flats Mumbai) मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर आता तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. कारण आता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 1 हजारांपेक्षा जास्त घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना म्हाडाचे परवडणारे घर मिळणार आहे. मुंबईत घरे खूपच महाग असल्याने मुंबईकर म्हाडाच्या घरांची लॉटरी येण्याची प्रतिक्षा करताना दिसून येतात. आता त्यांची मुंबई म्हाडा लॉटरीची (Mumbai Mhada Lottery) प्रतीक्षा संपणार आहे. कारण म्हाडा पुढील काही दिवसांत लॉटरीसाठीची घरे तयार करत सामान्य लोकांसाठी घरे उपलब्ध करून देत आहे. चला जाणून घेऊया मुंबईतील म्हाडाच्या घरांबाबत महत्वाची अपडेट.

नवी मुंबईत सिडकोचे 1 BHK घर अवघ्या 20 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

यापूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाने 4 हजार एवढ्या घरांची लॉटरी मुंबईतील नरिमन पॉइंट येथे काढली होती. या लॉटरीमधील विजेत्यांना घरांचा ताबा (Possession) देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आता म्हाडाच्या मुंबई मंडळाने पुढील लॉटरीसाठी प्रक्रियाही सुरू केली आहे. 1 हजार घरांपेक्षा जास्त घरांची लॉटरी काढण्यासाठी नियोजन केले जात असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे मुंबईमध्ये ठिकठिकाणी म्हाडाची ही घरे असणार आहेत.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

सध्याच्या काळात म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे 300 ते 350 एवढी घरे लॉटरीसाठी आहेत. पण लॉटरी काढण्यासाठी एवढी घरे पुरेशी नाही. गोरेगाव पहाडी (Goregaon Pahadi) याठिकाणी लॉटरीमध्ये असलेल्या घरांचे काम सुरू असून मुंबईत वेगवेगळ्या माध्यमांतून मिळत असणार्‍या घरांचा समावेश देखील या लॉटरीत करण्यात येणार आहे.

म्हाडाच्या प्रत्येक मंडळाची प्रत्येक वर्षी लॉटरी (Mhada Lottery)

म्हाडाची राज्यात अनेक मंडळे आहेत. त्यात मुंबई मंडळ, कोकण मंडळ, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक आणि अमरावतीचा यात समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार म्हाडाने प्रत्येक मंडळाची प्रत्येक वर्षी घरांची लॉटरी काढण्याचा निर्धार केला आहे.

खुशखबर! मुंबईत म्हाडाची मोक्याच्या ठिकाणी नवीन 86 घरे, येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती..

Leave a Comment