म्हाडाचे घर पाहिजे असेल तर 45 दिवसात एवढी रक्कम भरावीच लागणार; अन्यथा घर रद्द होणार..!

Mumbai Mhada Flats : म्हाडा मुंबई मंडळाच्या 4 हजार 82 घरांच्या सोडतीमधील 3 हजार 515 पात्र असलेल्या विजेत्यांना सोमवार रोजी ऑनलाईन पद्धतीने तात्पुरती देकार पत्रे वितरित करण्यात आलेली आहे. या पत्रानुसार 45 दिवसांच्या आत म्हणजेच 19 ऑक्टोबरपर्यंत विजेते असलेल्यांना सदनिकेच्या एकूण किंमतीच्या 25 टक्के एवढी रक्कम भरणे अनिवार्य आहे. पण सध्या सोशल मीडियावर म्हाडाने 45 दिवसांमध्ये 10 टक्के एवढी रक्कम भरण्याची मुभा दिल्याची चुकीची माहिती फिरत आहे. विजेत्यांसाठी 10 टक्के रक्कम भरल्यानंतर केवळ होम लोनसाठी (Home Loan) ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्याची मुभा देण्यात आलेली आहे. उर्वरित 15 टक्के एवढी रक्कम विहित मुदतीमध्ये (45 दिवसाच्या आत) भरावी लागणार आहे. असे न झाल्यास म्हाडाचे घर (Mhada Flat) रद्द होण्याची शक्यता आहे.

Mumbai Mhada Lottery

सोडतीच्यानंतर पात्र असलेल्या विजेत्यांना तात्पुरते देकार पत्र पाठवून 45 दिवसांच्या आत घराच्या एकूण किंमतीपैकी 25 टक्के रक्कम, तर त्यापुढील 60 दिवसांच्या आत 75 टक्के एवढी रक्कम भरून घेतली जाते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी 45 दिवस आणि पुढील 15 दिवसांची मुदतवाढ मिळाल्यानंतर 25 टक्के एवढी रक्कम न भरल्यास घर (Mhada Flat) रद्द केले जाते. पुढील 60 दिवसांमध्ये किंवा 90 दिवसांच्या असलेल्या मुदतवाढीमध्ये उर्वरित असलेली 75 टक्के रक्कम न भरल्यास घर रद्द केले जाते. असा नियम असताना म्हाडाने 10 टक्के एवढी रक्कम भरण्याची मुभा दिल्याची फेक माहिती सोशल मीडिया वर फिरत असल्याची बाब समोर आली आहे.

येथे वाचा – आजपासून करा म्हाडाच्या 5863 घरांच्या लॉटरीसाठी अर्ज, मिळेल कमी पैशात हक्काचे घर, येथे क्लिक करून पहा अर्ज कसा करावा?

म्हाडाच्या इतिहासामध्ये प्रथमच सोडतनंतर 20 दिवसांमध्ये रक्कम भरल्यानंतर घरांचा ताबा देण्यात येत आहे. विजेते असलेल्यांना 25 टक्के एवढी रक्कम एवढ्या कमी कालावधीमध्ये जमा करणे किंवा होम लोन मिळवणे शक्य होत नाही. म्हणून बर्‍याच विजेत्यांनी 45 दिवसांमध्ये 10 टक्के, तर उर्वरित असलेल्या 60 दिवसांमध्ये 90 टक्के एवढी रक्कम भरण्याची मुभा देण्याची मागणी करण्यात आली होती. म्हाडाद्वारे ही मागणी फेटाळण्यात आली आहे. म्हणून आता 45 दिवस आणि त्यापुढे अजून 15 दिवसांची मुदतवाढ मिळाल्यानंतर या कालावधीमध्ये 25 टक्के एवढी रक्कम भरणे गरजेचे आहे. अन्यथा घर रद्द करण्यात येईल, अशी महत्वाची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

येथे वाचा – खुशखबर! आता येथे कमी पैशात घेता येणार हक्काचे घर; येथे क्लिक करून पहा कोठे आणि कधी असणार घरांची लॉटरी?

Leave a Comment