मुंबईकरांची या घरांना जास्त पसंती; घर घेण्यापूर्वी एकदा पाहाच..!

मुंबईतील घरांच्या किंमतींबद्दल सगळीकडेच नेहमीच चर्चा होताना दिसते. मुंबईत अलिशान घरांसह परवडणारी घरे (Affordable Flats Mumbai) उपलब्ध आहेत. दोन्ही प्रकारच्या घरांची विक्री मुंबईत मोठ्या प्रमाणात होते. मागील वर्षात मुंबई शहर आणि उपनगरात दीड लाखापेक्षा अधिक प्रॉपर्टीची विक्री झाली आहे. विशेष गोष्ट म्हणजे या निवासी घरांच्या विक्रीमध्ये दोन बेडरूम, हॉल आणि किचन असलेल्या 2 बीएचके घरांची विक्री तब्बल 42 टक्के एवढी झाली आहे. याचा अर्थ मुंबईकर 2 बीएचके घरांना (2 BHK Flats Mumbai) जास्त पसंती देत असल्याचं समोर आलं आहे. मुंबईत नवीन घर खरेदी करण्याचा ट्रेण्ड सध्याच्या काळात जोरात असून त्यामध्ये मोठं घर खरेदी करण्याचा लोकांचा कल दिसून येत आहे.

मुंबईजवळ फक्त 13 लाखात घर; याठिकाणी परवडणारी घरे उपलब्ध, येथे क्लिक करून पहा बातमी..

2 बीएचके घरांना मागणी का वाढतेय?

अलीकडच्या काळात बिल्डरांकडून मोठी घरे म्हणजेच 2 बीएचके घरे (2 BHK Flats) मोठ्या प्रमाणात बनवली जात आहे. ज्यात दोन बेडरूम, एक हॉल, किचन आणि बाथरूम असते. कोरोनाच्या काळापासून वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यामुळे लोक मोठे घर घेण्याकडे जास्त पसंती देत आहे. विभागनिहाय विचार केल्यास 1 बीएचके आणि 2 बीएचके घरांच्या किमतीत असलेली तफावतही आता काही प्रमाणात कमी झालेली दिसतेय. त्यामुळे लोक 2 बीएचके घर (2 BHK Flat) खरेदी करण्याला जास्त पसंती देत आहे.

खुशखबर! महामार्गावर मिळणार म्हाडाचे स्वस्त घर; म्हाडाने उचलले ‘हे’ पाऊल, येथे क्लिक करून पहा बातमी..

भाड्याच्या घरांना सुद्धा प्रचंड मागणी

अलीकडच्या काळात मुंबई उपनगरात भाड्याने घर घेऊन राहणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या मुंबई शहर आणि मुंबई उपनगरामध्ये महिन्याचे किमान भाडे 25 हजार ते साडे पाच लाख रुपये यादरम्यान आहेत.

नवी मुंबईत सिडकोचे 1 BHK घर अवघ्या 20 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

Leave a Comment