रहस्यमय खड्डा (Mysterious pit in Marathi)
आज पर्यंत आपन अनेक रहस्यमय गोष्टी ऐकल्या आणि वाचल्या आहेत. या रहस्यमय घटना वाचत असताना खरोखर आपन किती एकाग्र झालेलो असतो. ते ठिकाण किंवा घटने मागचे रहस्य जाणून घेण्यासाठी आपले मन खुप उत्सुक झालेले असते. अशाच एक रहस्यमय जागे बद्दल आपन माहिती घेणार आहोत. आपन ज्याचे रहस्य जाणून घेणार आहोत तो एक एक खड्डा आहे. या खड्ड्याला नरकाचा दरवाजा म्हटलं जातं. यावरून आपन अंदाजा लावू शकतो की हा खड्डा किती भयंकर असेल. खड्ड्यात नेमकं काय रहस्य दडलं असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असणारच. Mysterious pit in Marathi
हे पण वाचा
- जगातील सर्वात मोठे, खतरनाक आणि रहस्यमय अमेझॉन जंगल (Amazon Jungle information in Marathi)
- रहस्यमय तलाव ! टाळी वाजवताच पाणी वाढू लागते
- बाप रे ! एवढ्या संपत्तीची मालक आहे श्रद्धा कपूर
- Top 20 Interesting facts about India in Marathi
नरकाचा दरवाजा ( Door of hell in Marathi )
हा खड्डा यमनच्या बरहूत मध्ये आहे. यमन हा पश्चिम आशियातील देश आहे. रहस्यमय समजला जाणारा हा खड्डा 112 मीटर खोल आहे. येथील स्थानिक लोकांच्या मते या खड्ड्यात भूत राहतात.

या खड्ड्याजवळ जाणे तर दूरच, येथील लोक खड्ड्या विषयी बोलण्याला देखील घाबरतात.

त्यांच्या मते खड्ड्या विषयी काही बोलल्यास आपल्या आयुष्यात वाईट घडू शकते असा त्यांचा समज आहे. तिथे असणाऱ्या जवळपासच्या लोकांचं असं म्हणणं आहे की खड्ड्या जवळ आलेली वस्तू खड्ड्या मध्ये ओढली जाते. येथील लोक याला नरकाचा दरवाजा म्हणतात. Door of hell in Marathi
रहस्यमय नरक विहीर (Mysterious ‘Well of Hell” in Marathi)
या खड्ड्याला रहस्यमय ‘नरक विहीर’ असं देखील म्हटलं जातं.
खड्ड्यात काय सापडले? (Mysterious hole/pit in Marathi)
खुप काळापासून रहस्यमय असलेल्या या खड्ड्याचा शोध घेण्यासाठी वैज्ञानिक या खड्ड्या उतरले. पण नंतर त्यांना जे काय या खड्ड्यात दिसले ते बघून वैज्ञानिक हैराण झाले. खड्ड्यात दुर्गंध येत असल्याचं वैज्ञानिक म्हणाले. त्यांना खड्ड्यात मोती, मोठ्या प्रमाणात साप आणि मेलेले प्राणी आढळून आले. पण येथील सापांची छेड जर काढली नाही तर ते काहीच करत नाही. असं त्यांचं म्हणणं आहे.
सालाह यांच्या मते हा खड्डा खुप काळापासून आहे. आणि यावर अधिक अभ्यास आणि संशोधन करण्याची गरज आहे. सालाह पुढे म्हणतात की हा खड्डा खुपच खोल आहे. त्यामूळे त्याच्या तळाशी ऑक्सिजनचं प्रामाण खुपच कमी आहे.
यमन देशाचे रोचक तथ्ये ( Yemen’s amazing facts in Marathi )
1960 च्या सुमारास यमन देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यमनचे दोन भाग करण्यात आले. एक उत्तर यमन आणि दुसरा दक्षिण यमन. उत्तर यमन मध्ये मोठ्या प्रमाणात सुन्नी सांप्रदायिक लोक होते तर दक्षिण यमन मध्ये सिया सांप्रदायिक लोक होते. पण 1990 मध्ये या दोन्ही भागांना जोडण्यात आले. यमन मध्ये अंतर्गत वाद खुप मोठ्या प्रमाणात आहे. या दोन सांप्रदायामध्ये नेहमी हिंसा आणि युद्ध होत असते. त्यामूळे तेथील लोक भीतीच्या वातावरणात आपले जीवन जगत आहे. या दोन सांप्रदायामध्ये होणाऱ्या युद्धाचे परिणाम तेथील लाखो सामान्य लोकांना भोगावे लागत आहे. येथील प्रतेक घरात शस्त्र आढळतात.