रहस्यमय झरा ! दर 15 मिनीटाला होतो चालू-बंद

रहस्यमय झरा (Mysterious waterfall in Marathi)

पृथ्वीवर असे अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत ज्यांचा उलगडा अजून पर्यंत शास्त्रज्ञ करू शकलेले नाही. म्हणतात ना “निसर्ग सर्वश्रेष्ट आहे” मानवाने कितीही प्रगती केली तरी त्याला निसर्गावर विजय मिळवणे खुप कठीण आहे. असेच काही रहस्य हे रहस्य बनून राहिलेले आहेत. अजून पर्यंत शास्त्रज्ञ त्यांचा शोध लावू शकले नाही. पृथ्वीवर असे अनेक रहस्यमय ठिकाणं असतील जेथे मानव अजून पर्यंत पोहोचू शकला नाही. आणि त्यांचा शोध घेणे कदाचित मानवाच्या आवाक्यात नसेलही. पण काही ठिकाणं असे आहेत जिथे माणूस पोहोचला खरा पण त्याचे रहस्य त्याला उलगडता आलेले नाही. असच एक ठिकाण अमेरीकेत असलेल्या व्योमिंग पर्वतातून उगम पावणारा आणि दर 15 मिनिटाला चालू-बंद होणारा पाण्याचा झरा ( Mysterious waterfall in Marathi ). आता हे ऐकूण तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसला असेल. दर 15 मिनिटाला झरा चालू-बंद होणे हे कसे काय शक्य आहे? असा प्रश्न हा लेख वाचत असताना कदाचित सर्वांनाच पडला असेल. पण हे खरच आश्चर्यचकित करणारं ठिकाण आहे.

ज्या पर्वत रांगेतून हा झरा वाहतो ती पर्वत रांग म्हणजेच व्योमिंग पर्वत रांग खुप मोठी पर्वत रांग आहे.
या पर्वत रांगेतूनच हा झरा वाहतो. या झऱ्याचे वैशिष्ट असे आहे, की डोंगरातून खुप वेगाने पाणी कोसळते. त्यानंतर दर 15 मिनिटांनी पाण्याचे वाहने आणि अचानक थांबणे सुर राहते. हे असे का होत असेल? हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक तर्क-वितर्क लावले आहे. किप सोलोमन यांनी झऱ्याच्या प्रवाहावर सायफन इफेक्ट ( Siphon Effect ) होत असल्याचं म्हटलं आहे. Amazing facts in Marathi, Interesting facts in Marathi.

असा लागला झऱ्याचा शोध (Discover the mysterious waterfall in Marathi)


वृक्षतोड करणारा एक व्यक्ती झऱ्याच्या जवळपास काम करत होता, तहान लागल्यानंतर तो पाणी पिण्यासाठी झऱ्यावर गेला, त्यानंतर झऱ्याच्या दर पंधरा मिनिटाला चालू-बंद होण्याच्या प्रक्रियेवर त्याने निरिक्षण केले. आता हा झरा पर्यटकांचं विशेष आकर्षण बनले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नागरिक येथे खुप मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.

रोचक तथ्य व महत्वाच्या घडामोडी नियमित मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा