आनंदाची बातमी! नवी मुंबईत स्वस्तात घर खरेदी करण्याची पुन्हा संधी, सिडको काढणार 5000 घरांची लॉटरी, पहा सिडकोची घरे नेमकी कुठे असणार?

Navi Mumbai 2 bhk flat : नवी मुंबईमध्ये आपले नवीन हक्काचे घर खरेदी करायचे असेल तर अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता नवी मुंबईमध्ये तुमचे हक्काचे घर (2 bhk flat in mumbai) तुम्हाला मिळू शकते. कारण आता म्हाडाच्या लॉटरी नंतर सिडको देखील घरांसाठी लॉटरी काढणार (CIDCO Flats Lottery) असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिडकोकडून तब्बल 5 हजारांपेक्षा जास्त घरांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता अनेकांचे नवी मुंबईत घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

मागील 2 वर्षांमध्ये सिडकोकडून दोन टप्प्यामध्ये 25 हजार एवढ्या घरांची योजना (Housing Scheme) राबवली. त्यातील जवळपास 7 हजार घरे काही कारणांमुळे विकलेली नाही. ग्राहकांनी पैसे न भरल्याने पुन्हा ही घरे ताब्यात घेण्यात आली. यासंदर्भात मागील काही महिन्यांपूर्वी सिडकोकडून जाहिरात देखील काढण्यात आली होती. पण त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार आता पुन्हा एकदा सिडकोकडून घरांची लॉटरी (Cidco Houses lottery) काढण्यात येणार आहे. ही घरे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वानुसार विकण्याची योजना आहे.

काय सांगता! म्हाडाच्या या घरांना प्रतिसाद वाढला; या स्वस्त घरांसाठी लवकर करा अर्ज, येथे क्लिक करून पहा बातमी..

दरम्यानच्या काळात, नवी मुंबईमध्ये गृहसंकुल (Home complex) बांधले जाणार आहे. आणि ठाण्यामध्ये लवकरच घरांची लॉटरी (Flats Lottery) काढण्यात येणार आहे. आता सिडकोकडून 2 खोल्यांच्या घराचा (2 bhk flats Mumbai) नवा पायलट प्रोजेक्ट राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील 2 वर्षांमध्ये सिडकोकडून दोन टप्प्यामध्ये 25 हजार घरांची योजना राबवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा तब्बल 5 हजार एवढ्या घरांची लॉटरी निघणार असल्याने नवीन घर खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या लोकांना ही जाहिरात प्रसिद्ध होण्याकडे लक्ष लागले आहे.

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

सिडकोची घरे नेमकी कुठे? (Cidco Houses)

म्हाडाच्या लॉटरीनंतर आता सिडकोकडून घरांच्या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या लॉटरीमध्ये 5 हजार एवढी घरे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली आहे. सिडको यासंदर्भात नियोजन करत आहे. आता सिडकोकडून टप्प्याटप्प्यामध्ये 5 हजार घरांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेकरिता स्वतंत्र संगणकीकृत प्रणाली तयार केली आली आहे. सिडकोची ही घरे खारघर, वाशी, कळंबोली, जुईनगर, मानसरोवर, उलवे याठिकाणी आहेत.

मुंबईकरांसाठी सरकारचं मोठं गिफ्ट; म्हाडा संदर्भात सरकारची मोठी घोषणा, येथे क्लिक करून पहा बातमी..

2 BHK असणार ही घरे (2 bhk flats Navi Mumbai)

सिडकोकडून नवी मुंबईमध्ये गृहसंकुल बांधण्यात येणार आहे. नावडे नोड याठिकाणी सिडकोकडून 2 बीएचके घरे (2 bhk flats) बांधली जाणार आहे. नावडे या नव्याने विकसित होणार्‍या नोडमध्ये मध्यमवर्गीयांकरिता स्वतंत्र टाऊनशिपची (Township) उभारणी करण्याचा प्रस्ताव सिडकोने ठेवला आहे. यंदा या घरांची घोषणा होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. खासगी विकासकांच्या घरांच्या तुलनेत ही घरे स्वस्त (Cheap Home) असणार, अशी महत्वाची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईमध्ये सामान्य लोकांची घर खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे.

आनंदाची बातमी! आता मुंबईत याठिकाणी कमी किंमतीत मिळेल म्हाडाचा 1 बीएचके फ्लॅट, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment