नवाब मलिकांचं ट्वीट प्रचंड व्हायरल.. म्हणाले ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’

मागील काही दिवसांपूर्वी आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक झाली होती. नार्कोटिक्स कण्ट्रोल ब्यूरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे व त्यांच्या टीमने ही अटक केली होती. आर्यन खान बॉलिवूडचे बादशहा शाहरूख खानचा मुलगा असल्यामूळे हा एक चर्चेचा भाग बनला आहे.

आता पर्यंत या प्रकरणासंदर्भात ज्या ज्या घडामोडी घडल्या त्या संपुर्ण देशाने पहिल्या. यामध्ये राजकारण देखील झालं.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मालिक यांनी सतत नार्कोटिक्स कण्ट्रोल ब्यूरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वाणखेडे यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यानंतर विरोधी पक्षानेते देवेंद्र फडणीस यांनी देखील यामध्ये उडी घेत समीर वानखेडे यांच्या बाजूने उभ राहण्याचा प्रयतं केला. त्यामूळे महाराष्ट्राचे राजकारण या विषयावर चांगलेच तापलेले बघायला मिळाले.

हे पण वाचा

नवाब मालिक यांनी आर्यन खानची बाजू घेत ‘आर्यन निर्दोष आहे आणि त्यांना फक्त शाहरूख खानकडून पैसे उकळायचे आहे’ असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 25 दिवसांच्या कस्टडी नंतर गुरुवारी (दि.28) मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यनला जामीन मिळाला. त्यानंतर नवाब मलिक यांनी आपल्या ट्वीटर अकाउंट वर एक प्रतिक्रीया व्यक्त केली. आणि ते ट्वीट काही क्षणात व्हायरल झाले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यनला जामीन मिळाल्यानंतर नवाब मालिक यांनी एक ट्वीट केलं. आणि ते प्रचंड व्हायरल देखील होत आहे. त्यांनी बॉलिवूडच्या सिनेमामधील डायलॉग म्हणत ट्वीट केलं आहे. ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ असं त्या ट्वीट मध्ये त्यांनी म्हटलं आहे.

एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबई येथील क्रूज शिप कॉर्डेलिया वर छापा टाकला होता. त्यानंतर एनसीबीने आर्यन खान, धमेचा आणि अरबाज या तिघांना 3 ऑक्टोबर ला अटक केली होती.

महत्वाच्या बातम्या आणि माहितीसाठी आमचा WhatApp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment