प्रबळ इच्छाशक्ती असेल “तो क्या करेगा कोरोना वायरस”..!

प्रबळ इच्छाशक्ती असेल तर सर्व शक्य आहे. हे आपन बऱ्याच उदाहरणातून पाहिलं आहे. प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर लोकांनी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करुन दाखवल्या आहे. मग ते एखादे जोखमीचे काम असो की एखादे मोठे संकट असो आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर लोकांनी आपल्या समोर असणाऱ्या समस्यांवर मात करुन दाखवलेली आहे. हे बऱ्याच उदाहरणातून सिध्द झाले आहे.

अलीकडेच महाराष्ट्रासह देशामध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. अपुरे बेड्स व औषधांच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची खुप धावपळ झालेली आहे. आणि काही रूग्णांनी उपचारा अभावी आपले प्राण गमावले आहे. पण काही रुग्ण असे आहेत की ज्यांनी वयाची शंभरी ओलांडली आहे आणि त्यांनी आपल्या प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर कोरोनाला हरवले आहे.

लातूर जिल्ह्यातील काटगाव तांडा येथील आजी-आजोबांनी घाबरून न जाता प्रबळ इच्छाशक्ती ठेऊन कोरोना व्हायरसवर अवघ्या सात दिवसात विजय मिळवला. आजोबांचे वय 105 वर्ष आहे तर आजींचे वय 95 वर्ष आहे. कोरोना झाल्यानंतर धैर्यानं तोंड दिले तर काहीच होत नाही, अस सांगून सरकारी डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे पुनर्जन्म मिळाला, असं सांगत त्यांनी आभार व्यक्त केले. या वयोगटातील अनेक जेष्ठ नागरिकांनी आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केल्याच्या बातम्या आपन ऐकल्या आहे. या आजाराला घाबरून न जाता योग्य ती काळजी घेऊन धैर्याने तोंड दिलेच पाहिजे. तेव्हा आपन ही लढाई नक्कीच जिंकतो.

लासलगाव मधील नाफेडचे माजी अध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी 88 वय वर्षी आणि मधूमेह, हृदयविकार या सारखे आजार असतांना आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाला हरवले. प्रबळ इच्छाशक्ती जर असेल तर सर्व शक्य आहे. हे या उदाहरणातून दिसून येते.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment