खुशखबर! मुंबईत म्हाडाची मोक्याच्या ठिकाणी नवीन 86 घरे, पहा लोकेशन आणि कधी येणार लॉटरी?

Mumbai Mhada Lottery : मुंबई म्हाडा लॉटरीची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आता येत्या काळात मुंबईकरांना मुंबई म्हाडा लॉटरीत (Mumbai Mhada Lottery) मोक्याच्या ठिकाणी घर घेण्याची मोठी संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे या लॉटरीतील घरांची संख्या वाढवण्यात आली असून मुंबई मंडळाला मोक्याची ठिकाणी नवीन 86 घरे उपलब्ध होणार आहे. जर तुम्हाला मुंबई म्हाडा लॉटरीत घर मिळवायचे असेल तर या लॉटरी बाबत खाली दिलेली माहिती नक्कीच वाचा. मोक्याची ठिकाणी असलेली ही 86 घरे नेमकी कुठे आहे? आणि ही मुंबई म्हाडा लॉटरी कधी येणार? याची माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

मुंबई म्हाडा लॉटरीसाठी याठिकाणी 86 घरे उपलब्ध

जर तुम्हाला मुंबईत म्हाडाचे घर (Mhada Flats Mumbai) पाहिजे असेल तर आता तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण पुढील मुंबई म्हाडा लॉटरीतील घरांची संख्या वाढवण्यात आली आहे. गोरेगाव पश्चिम याठिकाणी असलेल्या पत्रा चाळ प्रकल्पात म्हाडाला नव्याने 86 घरे उपलब्ध होणार आहे. ज्यांना येत्या लॉटरीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. गोरेगाव पश्चिम याठिकाणी पत्रा चाळ प्रकल्पात नव्याने एक इमारत बांधण्यात येत आहे. ज्यांच काम सध्या वेगाने सुरू आहे. या इमारतीत म्हाडाला लॉटरीसाठी 86 घरे उपलब्ध होणार आहेत. चार विंगमध्ये घरांचे काम सुरू असून यामधील A विंगमध्ये 86 घरांचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

नवी मुंबईत सिडकोचे 1 BHK घर अवघ्या 20 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

विशेष म्हणजे ही घरे मोक्याच्या ठिकाणी असून हा प्रकल्प गोरेगाव स्टेशन पासून जवळील अंतरावर आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत हा भाग चांगला आहे. अशा ठिकाणी जर अर्जदाराला घरे मिळाली तर म्हाडाच्या लॉटरीला अर्जदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळू शकतो.

मुंबई म्हाडा लॉटरी कधी येणार? (Mumbai Mhada Lottery)

मुंबईतील 2023 च्या लॉटरी मधील शिल्लक घरांची जाहिरात एप्रिल मध्ये येणार असल्याचं म्हाडाकडून सांगण्यात आलं असलं तरी देखील मुंबई मंडळाची मोठी लॉटरी ही 2025 मध्ये येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजेच अजून एक ते दीड वर्ष या लॉटरीसाठी थांबावं लागणार आहे.

मुंबईत चक्क 323 स्क्वेअर फुटामध्ये 2 BHK फ्लॅट; किंमत पाहिली का? येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment