अरे वा! नवी मुंबईत सिडकोची नवी योजना; मध्यमवर्गीयांना कमी किमतीत मिळणार घर..!

Cidco Lottery 2024 : मुंबई, नवी मुंबईत म्हाडा ज्या पद्धतीने लॉटरीच्या माध्यमातून किफायतशीर दरात घरं उपलब्ध करून देते त्याच पद्धतीने सिडकोकडून देखील किफायतशीर दरात घरं उपलब्ध करून देण्यात येतात. सामान्य नागरिकांना मुंबईत आपल्या बजेटमध्ये घरे मिळावी म्हणून म्हाडा आणि सिडकोकडून विविध योजना आणल्या जातात. अलीकडेच सिडकोकडून एक नवी योजना सादर करण्यात येत आहे.

सिडको आणि म्हाडासारख्या योजना (Mhada Scheme) हक्काच्या घराच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी मदत करत आहेत. मुंबईत ज्या ठिकाणी घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत त्याच ठिकाणी म्हाडा-सिडको मात्र खिशाला परवडतील अशा किमतीत घरं (Cidco Flats Mumbai) उपलब्ध करून देत आहेत. आता सिडकोच्या वतीनं नवी मुंबईतील पनवेल भागात एक नवी योजना (Cidco Scheme) हाती घेण्यात आली आहे. 

मुंबईजवळ फक्त 13 लाखात घर; याठिकाणी परवडणारी घरे उपलब्ध, येथे क्लिक करून पहा बातमी..

काय आहे योजना?

सिडकोने पनवेल भागात बरेच नोड विकसित केले असून आता 30 ते 40 वर्षांच्या काळानंतर या नोडमध्ये असलेले अनेक गृहप्रकल्प आणि बांधकामे मोडकळीस आले आहेत. मागील अनेक वर्षांपासून या गृहप्रकल्पांच्या पुनर्विकासाचा विषय डोकं वर काढत होता. पण अखेर आता या इमारतींच्या पुनर्विकासासाठी मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळे आता याचा फायदा मध्यमवर्गीयांना होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिडकोच्या या पहिल्या पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून 3 मजली असलेल्या इमारतींच्या जागेवर 14 मजली असलेले 5 टॉवर बांधण्यात येणार आहेत.

नवी मुंबईत सिडकोचे 1 BHK घर अवघ्या 20 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

खांदा कॉलनीमधील या प्रकल्पाचे काम पुढील 3 वर्षांत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या योजनेचा लाभ थेट मध्यमवर्गीय लोकांना होणार आहे. अलीकडेच खांदा कॉलनीत असलेल्या पीएल सहा प्रकारच्या सह्याद्री सोसायटीचा भूमिपूजन सोहळा पार पडला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या नवीन पनवेल, खांदा कॉलनी आणि कळंबोली या भागात असलेले सिडको नोडमधील बरेच प्रकल्प सध्याच्या घडीला पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लागल्यास याठिकाणी असणाऱ्या मध्यमवर्गीय लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

खुशखबर! मुंबईत म्हाडाची मोक्याच्या ठिकाणी नवीन 86 घरे, येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती..

प्राथमिक माहिती अशी की येत्या काही दिवसांमध्ये मुंबई पुणे महामार्गाला लागून असलेल्या खांदा कॉलनीमधील गृहप्रकल्पाला नवीन रुप प्राप्त होणार आहे. हा प्रकल्प राज ग्रुपच्या तुलसी होममेकर कंपनीद्वारे विकसित करण्यात येणार आहे. यात 192 एवढ्या जुन्या घरधारकांना वाढीव कार्पेट एरियासह मोठी घरं देण्यात येणार आहेत. तसेच 460 एवढी नवीन घरं देखील बांधण्यात येणार आहेत. आणि यात 49 एवढी व्यावसायिक गाळ्यांचाही याठिकाणी समावेश असणार आहे. 

Leave a Comment