आता मुंबईकरांसाठी म्हाडाची नवीन योजना; आता असे होणार घराचे स्वप्न पूर्ण, पहा महत्वाची अपडेट..!

मुंबई : सध्या मुंबईत रिअल इस्टेटची (Real Estate Mumbai) मोठी चर्चा होत आहे. कारण मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी आणि या आर्थिक राजधानीत सध्या जमिनी आणि घरांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे जो तो मुंबईतील घरांच्या किंमती बाबत बोलताना दिसून येतो. मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असलेले वन बीएचके घरही (1 bhk flat Mumbai) 40 ते 50 लाखांच्या जवळपास आहे. त्यामूळे सामान्य लोक सध्या म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी धावपळ करताना दिसून येतात. आतापर्यंत म्हाडाने अनेकांचे मुंबईत घर (2 bhk flat Mumbai) घेण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. आता पुन्हा मुंबईकरांसाठी म्हाडाकडून एक मोठी योजना आखण्यात आली आहे.

म्हाडाच्या मुंबई बोर्डाकडून प्लॉटचा लिलाव करण्याची महत्वाची योजना आखण्यात आली आहे. म्हाडाला जो सर्वात जास्त ऑफर देणार त्याला ती जमीन देण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या प्लॉट संदर्भात माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्लॉटची माहिती मिळाल्यानंतर त्या एरियानुसार त्याची किंमत ठरवण्यात येणार आहे. या प्लॉटची किंमत निश्चित झाल्यानंतर त्याचा लिलाव करण्यासाठी जाहिरात काढली जाणार आहे. हे सर्व प्लॉट मुंबईतील विविध भागांमध्ये असणार असल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे.

म्हाडा लवकरच आता प्लॉट (Mhada Plots) विकण्याचा निर्णय घेणार आहे. मुंबईत याबाबत अधिकाऱ्यांकडून परीक्षण करण्यात येत आहे. मुंबईमध्ये म्हाडाचे कित्येक प्लॉट रुग्णालय, शाळा, कॉलेज, मनोरंजन आणि खेळाची मैदानांसाठी आरक्षित केले आहेत. पण, हे प्लॉट मागील बर्‍याच वर्षांपासून उपयोगात न येता पडून आहेत. आतापर्यंत या जामिनींवर काहीच बांधकाम करण्यात आलेले नाहीये. अशा परिस्थितीत या खाली पडून असलेल्या जमीनींवर अतिक्रमण केले जाते. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यासाठी म्हाडाला धावपळ करावी लागते. म्हणून ही समस्या सोडवण्यासाठी म्हाडाकडून काही अटी व शर्तीसह आरक्षित प्लॉट विकण्याची योजना आखण्यात आली आहे. 

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

म्हाडाकडून 600 घरांसाठी लॉटरी (Mhada Flats Lottery)

मुंबईमध्ये स्वतःच्या घराचं स्वप्न पाहत असणार्‍या नागरिकांसाठी मुंबई मंडळाकडून लवकरच पुन्हा एकदा लॉटरी काढण्यात येणार आहे. मुंबई मंडळाकडून 600 घरांच्या लॉटरीसाठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये काढलेल्या लॉटरीमधून शिल्लक राहिलेल्या 600 एवढी घरे या नवीन लॉटरीत (Mhada Lottery Mumbai) सहभागी करण्यात येणार आहेत.

मुंबईतील या लोकांना लागली घरांची लॉटरी, यात तुमचे नाव आहे का? येथे क्लिक करून पहा..

1 thought on “आता मुंबईकरांसाठी म्हाडाची नवीन योजना; आता असे होणार घराचे स्वप्न पूर्ण, पहा महत्वाची अपडेट..!”

  1. Mahadachya gharanchi ji scrutiny hote tybadal mi sashank ahe maze mumbait ekhi Ghar naatana mazyvar kotahi loan naatana mi mhadache 4 form bharlale pan ekhi lagla nahi Ani mazya mahititil eka vyktila ki jichykade mumbait 2 ghare Astana mhadche Ghar lagle he kase ghadte.

    Reply

Leave a Comment