स्वातंत्र्य दिनाची पुढील परेड नवीन राजपथावर, नोव्हेंबर 2021 पर्यंत पूर्ण होणार सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम..!

नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाची परेड पुढील वर्षी नव्याने बांधण्यात येत असलेल्या राजपथावर होईल. शुक्रवारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट पर्यंत सेंट्रल विस्टा मार्गाचे चे पुनर्विकास कार्य हे नोव्हेंबर 2021 पर्यंत होण्याची अपेक्षा आहे.भारताचे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्री हरदिप सिंह पुरी यांनी चालु असलेल्या कामाच्या स्थितीचा आढावा घेतला. नागरिकांना अभिमान वाटेल असा एवेन्यू सेंट्रल विस्टा प्रकल्पा अंतर्गत निर्माण होईल असे ते म्हणाले.
सेंट्रल विस्टा एवेन्यू प्रकल्पाचा चालु असलेल्या कामाच्या स्थितीचा आढावा गृहनिर्माण शहरी कार्यमंत्रालयाचे सचिव, मंत्रालय आणि CPWD यांचे अधिकारी, ठेकेदार आणि आर्किटे्क्ट बिमल पटेल यांनी घेतला. आतापर्यंत होत असलेल्या कामाची प्रगती वेळेवर होत असून समाधान कारक आहे. आणि नागरिकांना अभिमान करण्यायोग्य एवेन्यू सेंट्रल विस्टा प्रकल्पा अंतर्गत मिळणार असल्याची त्यांनी ट्विट करून माहिती दिली.


मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राजपथ पुनर्विकास प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणत दगडांची कामे, अंडर पासचे बांधकाम, भूमिगत सुविधा, पेव्हर ब्लॉक, बागायती कामासाठी व पार्किंग साठी मुबलक व पुरेशी जागा उपलब्ध आहे.
अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, कृतीम रित्या बांधण्यात आलेल्या तलावांवर 12 पूल बांधण्यात येत आहेत. राजपथावर भेट देणाऱ्या नागरिकांना एक अद्भुत असा अनुभव येईल.
सेंट्रल विस्टा एवेन्यू या प्रकल्पाचे काम नोव्हेंबर 2021 पर्यंत पूर्ण होईल आणि पुढील वर्षी नव्याने विकसित झालेल्या राजपथावर स्वातंत्र्य दिनाची परेड होईल.


प्रसिद्ध इन्फ्रास्ट्रक्चर फर्म शापुरजी पल्लोनजी आणि कंपनी प्रायव्हेट लिमिटेड भारत सरकारच्या या महत्त्वाच्या सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्पाच्या भागाच्या स्वरूपात या प्रकल्पाला कर्यांवयित करीत आहेत.
चालू घडामोडी व रोचक तथ्य मिळवण्यासाठी ReadMarathi.Com च्या facebook पेजला लाईक करा