खुशखबर! ठाणे, कल्याणमध्ये 19 हजार घरांची निर्मिती होणार; या लोकांना मिळणार घरं, पहा योजेनेबद्दल माहिती..

मुंबई तसेच मुंबई जवळील भागात राहणार्‍या लोकांसाठी दररोज दिलासा देणाऱ्या बातम्या समोर येत आहे. सरकार गृह योजनांच्या माध्यमातून सामान्यांना मुंबईत आणि मुंबईजवळील भागात परवडणाऱ्या दरात घरे (2 bhk flats in Mumbai) उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे सामन्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होत असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत उद्योग, व्यवसाय व रोजगाराच्या मोठ्या संधी असल्यामूळे घरांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबांना मुंबईत साधारण 1 बीएचके घर (1 bhk flats Mumbai) खरेदी करणे सुद्धा अवघड जात आहे. अशा लोकांना म्हाडा, सिडको आणि प्रधानमंत्री आवास योजना या सरकारी गृह योजनांचा फायदा होत असून त्यांना हक्काचे घर मिळत आहे.

अशातच आता मुंबई जवळील ठाणे व कल्याणमध्ये म्हाडाकडून तब्बल 19 हजार घरांची निर्मिती होणार असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात घरे मिळणार आहे (Mhada Flats Thane). म्हाडाची ही 19 हजार घरे नेमकी कोणत्या नागरिकांना मिळणार? ही घरे तुम्हाला मिळणार का? याची माहिती आपण पाहणार आहोत.

या लोकांना मिळणार म्हाडाची 19 हजार घरे

म्हाडाकडून गिरणी कामगारांकरिता विविध गृहनिर्माण योजना (Housing Scheme) राबविण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. कारण अलीकडेच ठाणे आणि कल्याणजवळ 54 एकर एवढ्या भूखंडाची मागणी राज्याच्या महसूल विभागाकडे करण्यात आली आहे. हे भूखंड मिळाल्यानंतर म्हाडाकडून गिरणी कामगारांकरिता गृहनिर्माण योजना राबवून तब्बल 19 हजार एवढ्या घरांची निर्मिती करणे शक्य होणार आहे.

काय सांगता! आता मुंबईतील या 30 हजार लोकांना मिळणार म्हाडाची घरे, येथे क्लिक करून पहा बातमी..

गिरणी कामगारांच्या घरांकरिता ठाणे (Thane), कल्याण आणि मुंबई महानगर प्रदेशामधील तसेच राज्यामधील पश्चिम महाराष्ट्रामध्ये असलेले भूखंड गृह निर्मितीसाठी उपलब्ध करून द्यावे, असे स्पष्ट झाले आले. त्यानुसार आता म्हाडाकडून ठाणे आणि कल्याणमधील काही भूखंड निश्चित केले असून यावर आता गिरणी कामगारांसाठी लवकरच गृहनिर्माण योजना (Housing Scheme) राबविणे शक्य होणार असल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे.

मुंबईतील या लोकांना लागली घरांची लॉटरी, यात तुमचे नाव आहे का? येथे क्लिक करून पहा..

आतापर्यंत जवळपास 76 हजार 878 एवढ्या गिरणी कामगारांनी घरांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले आहेत. यातील 59 हजार 549 एवढे अर्जदार पात्र ठरले आहे आणि 452 अर्जदार अपात्र ठरले आहेत. 12 हजार 140 एवढ्या गिरणी कामगारांकडून (Mill Worker) स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे..

Leave a Comment