काय सांगता! आता म्हाडाचे घर विकण्यासाठी खासगी कंपनी मैदानात; आता घरांच्या किमतीत झाला मोठा बदल..!

Mhada Flats : अलीकडे शासकीय यंत्रणेच्या वापराने कामे न करता प्रशासकीय यंत्रणा तसेच जनता यांच्यामध्ये अशी सर्व कामे खाजगी कंपन्या तसेच विविध संस्थेच्या माध्यमातून (एजन्सी) करून घेण्याचे प्रकार सर्वच शासकीय खात्यामध्ये वाढत चालले आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) यांनी सुद्धा याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या घरांची (Mhada Flats) विक्री करण्यासाठी नागपूरमधील एक खाजगी कंपनी निवडली आहे. या कंपनीचा म्हाडा मध्ये समावेश होताच केवळ सहा महिन्यातच घरांच्या किमती लाखो रुपयांनी वाढल्या.

म्हाडा मंडळाच्या माध्यमातून गरजू नागरिकांना अगदी परवडणाऱ्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर घरे (Affordable Flats) उपलब्ध व्हावीत, तसेच शासकीय जमीन विकसित करून घरांचे उद्दिष्ट पार पाडण्यासाठी राज्य सरकार सतत प्रयत्न करत आहे. नागपूर मध्ये चंद्रपूर, बेलतरोडी, वांजरा, वडधामना, सुराबर्डी, दवालामेटी, डिगडोह, नारी, शांतीनगर या ठिकाणी तादाळा या विभागामध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून (आर्थिक कमकुवत घटक) यासोबतच लघुउत्पन्न गटासाठी, तसेच मध्यम उत्पन्न गटासाठी घरांची बांधणी केली आहे. या घरांची विक्री करण्यासाठी अधिकृत जाहिरात दोन-तीनदा प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु या घरांची विक्री झाली नाही आणि घरांची विक्री झाली नसल्यामुळे म्हाडाने जी काही गुंतवलेली रक्कम होती ती अडकूनच पडली. म्हणूनच म्हाडा मंडळाने घरे विकण्याची प्रक्रिया ही खाजगी संस्थेच्या माध्यमातूनच करायची असा निर्णय घेतला. अशावेळी नागपूर म्हाडाने प्राधिकरणाची मंजुरी घेतली आणि शेवटी नागपूर मधील एका खाजगी संस्थेला हे सर्व काम दिले. म्हाडाच्या घरांची विक्री करण्यासाठी ही संस्था चांगलीच मदत करत आहे. या संस्थेला विविध काम सोपवले आहेत त्यामध्ये आवश्यक कागदपत्रे प्राप्त करणे, ग्राहकांशी संपर्क साधने, कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे इत्यादी बाबींचा समावेश होतो..

खुशखबर! आता घ्या चॉईस फॉर्म भरून पाहिजे तिथे घर; येथे क्लिक करून पहा बातमी..

घरांची खरेदी करण्यासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना ही एजन्सी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधण्याची सूचना करत आहे. तिथून पुढे संबंधित ग्राहकाला आपले कार्यालय असेल त्या ठिकाणी बोलवून घेतले जात आहे. परंतु जे नागरिक घर खरेदी करू इच्छिणारे आहेत त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली आहे की, गतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी एक लाखांपासून चार लाखांपर्यंत घरांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. याबाबतची तक्रार देखील केली.

अरे वा! आता तुम्ही देखील घेऊ शकता 1 कोटीचे घर, फक्त वापरा ही ट्रिक, येथे क्लिक करून पहा बातमी..

दरम्यानच्या कालावधीमध्ये बांधकाम कंत्राटदारांशी झालेला करार तसेच म्हाडाने निश्चित केलेला दर सतत बदलता येत नाही. कंत्राट दाराने बांधकामाला विलंब केला असेल किंवा प्रशासकीय अडचणीमुळे वेळ झाला असेल तर निश्चित झालेल्या किमतीवर या घराची विक्री होऊच शकत नाही. अशी माहिती म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी यांनी दिले.

दीड लाखाने किंमत वाढली-

शांतीनगर इडब्ल्यूएस योजनेमध्ये ४५९.५६ चौरस फुटाचे क्षेत्रफळ असलेल्या घरांची अंतिम किंमत 12 लाख 48 हजार रुपये निश्चित करण्यात आली होती. तसेच यामध्ये म्हाडाशुल्क मिळवले तर एकूण किंमत 13 लाख 48 हजार रुपये होतात. आता याच घरांची किंमत बघितली तर 15 लाखांवर पोहोचली आहे. अशी माहिती खाजगी एजन्सी ने तयार केलेल्या पत्रकाच्या माध्यमातून दिसत आहे.

सिडकोची तब्बल 30 हजार घरे; पहा नवी मुंबईत कोणत्या भागात किती दर? येथे क्लिक करून पहा बातमी..

घरांची किंमत वाढली नाही-

घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आणखी मदत व्हावी म्हणूनच म्हाडाने खाजगी एजन्सी नेमली आहे. त्यासाठी प्रत्येक घरामागे म्हाडा त्यांना दहा हजार रुपयांचा मोबदला देत आहे. परंतु म्हाडाच्या घरांच्या किमती अद्याप वाढवण्यात आल्या नाहीत. मागील वर्षी प्रमाणेच यंदाच्या वर्षी सुद्धा त्याच किमती आहेत. सध्या म्हाडाची घरे (Mhada Flats) बांधून दोन तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. घर खरेदी करणाऱ्या ग्राहकाला त्यामध्ये रंगरंगोटी किंवा डागडूजी करायची असेल तर अशावेळी ही रक्कम आकारून एजन्सी स्वतः ही सर्व कामे करून देऊ शकते. परंतु ग्राहकांना एजन्सीच्या माध्यमातून ही सर्व कामे करून घेणे बंधनकारक नसेल. तसेच एजन्सी सुद्धा याबाबत कोणताही दबाव टाकू शकत नाही.

  • महेशकुमार मेघमाळे, मुख्य अधिकारी, म्हाडा..

Leave a Comment