आता PM Kisan योजनेचा हप्ता मिळवायचा असेल तर ‘हे’ कार्ड द्यावे लागणार, वाचा सविस्तर..!

कोणत्याही योजनेचा लाभ पात्र व्यक्तीलाच मिळावा यासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील असते. त्यासाठी योजनेच्या प्रक्रियेमध्ये असो वा अन्य नियमांमध्ये वेळोवेळी बदल केले जातात. यामूळे योजनेचा लाभ अपात्र व्यक्तीला न मिळता पात्र व्यक्तीलाच मिळतो. असाच बदल आता PM Kisan सन्मान निधी योजनेत केला आहे. या बदलामूळे आता पात्र शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. अपात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहिये. यामध्ये नेमके अपात्र शेतकरी कोण असणार आहे? हे पाहण्यासाठी बातमी पुर्ण वाचा…(Now if you want to get the installment of PM Kisan Yojana, you have to give this card)…

PM Kisan योजनेचा लाभ घेण्यासाठी राशन कार्ड अनिवार्य

केंद्र सरकारने 10 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 1 जानेवारीला ट्रान्स्फर केले आहे. आता या पुढे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी राशन कार्ड द्यावे लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे राशन कार्ड असणार नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही. या योजनेचा 11 वा हप्ता एप्रिल किंवा मे महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. हा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला राशन कार्ड ऑनलाइन अपडेट करावे लागेल. तरच या 11 व्या हप्त्याचा लाभ मिळेल.

PM Kisan योजनेसाठी ‘हे’ असतील अपात्र

कोणत्याही योजनेचा लाभ पात्र व गरजूंना मिळणे आवश्यक असते. त्यासाठी पात्र व अपात्र कोण असतील हे अगोदरच ठरवलं जातं. PM Kisan योजनेसाठी अपात्र यादी पुढील प्रमाणे –
* इनकम tax भरणारे, वकील, अभियंता, डॉक्टर तसेच चार्टर्ड अकाउंटंट हे सर्व या योजनेसाठी अपात्र आहेत.

पीएम किसान योजना

पीएम किसान या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. हे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरीत केले जातात. या योजनेमूळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी हा सरकारचा (Govt of India) ऊद्देश आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी असलेल्या सर्वोच्च योजनांपैकी एक समजली जाते.

अशाच शेती विषयक योजना, हवामान अंदाज व शेतमालाचे बाजार भाव आपल्या फोन वर मिळवण्यासाठी WhatsApp बटनावर क्लिक करून आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

2 thoughts on “आता PM Kisan योजनेचा हप्ता मिळवायचा असेल तर ‘हे’ कार्ड द्यावे लागणार, वाचा सविस्तर..!”

 1. Pm kisan Yojana तील 9 वा( म्हणजे माझा8वा)हप्ता नियमित प्रमाणे मंजुर असुन माझ्या बँक खात्यात अद्याप जमा झाला नाही.(such Account not Avelable)असा शेरा येत आहे. तरी क्रुपया सदर हप्ता ची रक्कम रू.2000 त्वरीत टाकण्याचे करावे ही विनंती.
  कारण योजनेचा10वा हप्ता(माझा9वा हप्ता)बँक खात्यात जमा झाला आहे तो मला मिळाला.
  मे.जा.होय.
  आपला शेतकरी,
  महेंद्र निंबा पाटील.
  मु.इंधवे, ता.पारोळा, जि. जळगाव. पिन-425113.

  Reply
 2. Balu Vitthal kirte mea baramati yethe rahati mala jamin nahi mea bhumihin ahe tiri mala jamin ghenya Sathi SBI Bank mala jamin ghenya Sathi madat Karu sakateka tyacha vyaj dar kiti ahe tyacha kalawadi kiti asto please mala margadation Kara

  Reply

Leave a Comment