मुंबईत जुना फ्लॅट खरेदी करावा की नवीन फ्लॅट, कोणता पर्याय चांगला? घर घेण्यापूर्वी नक्की वाचा…!

अनेक लोकांसाठी मुंबईत स्वतःचे घर (2 BHK Flats Mumbai) असणे हे एक स्वप्न आहे. आपले हक्काचे घर खरेदी करणे आणि ते सुद्धा मुंबई सारख्या मोठ्या शहरात हा त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय असतो. प्रमुख शहरांमध्ये रिअल इस्टेटच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत, तुम्ही एकतर नवीन फ्लॅट (Flats) घेण्याचा विचार करू शकता किंवा मग तुमच्याकडे जुने घर म्हणजेच पूनार्विक्री साठी असलेले घर विकत घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. घर नवीन घ्यावे की जुने? बहुतेक लोकांना घर घेताना हाच प्रश्न सतावत असतो की त्यांनी नेमके कोणते घर घ्यायला हवे?

बहुतेक घर खरेदीदार त्यांच्यासाठी कोणती घर खरेदी योग्य असेल याची चिंता करतात. अशा गोंधळात टाकणाऱ्या परिस्थितीत तुम्ही स्वत:साठी कोणते घर घ्यावे? त्यासाठी कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या याबद्दल आता आपण या लेखातून सविस्तर जाणून घेऊया.

जुने घर घेण्याला पसंती : COVID-19 नंतर रियल इस्टेटच्या (Real Estate) किमती वाढल्यामुळे, बरेच लोक नवीन घरं खरेदी करण्यापेक्षा जुनेच घर खरेदी करण्याला अधिक पसंत करत आहेत. खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी बिल्डर अनेक नवीन प्रोजेक्ट्स आणि ऑफर घेऊन येत आहेत, परंतु खरेदीदारांना खात्री नसते की यांपैकी सर्वोत्तम गुंतवणूक कोणती आहे. दोन्ही घरांचे स्वतःचे असे काही फायदे आणि तोटे आहेत, मग तुम्ही नवीन घर खरेदी करा किंवा मग जुने. अधिकतर वेळेला पॅटर्न, लोकेशन आणि बजेट या गोष्टींवर तुम्ही कोणते आणि कोणत्या प्रकारचे घर घ्यायचे हे अवलंबून असते.

नवीन घराचे काय फायदे आहेत? : तुम्ही गुंतवणुकीसाठी नाही तर राहण्यासाठी घर शोधत असाल, तर तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे कारण, विशेषत: आता सारख्या महागाईच्या काळात, प्रॉपर्टी वारंवार खरेदी केल्या जात नाहीत. तसेच हा एक महाग आणि महत्त्वपूर्ण व्यवहार आहे, ज्याबद्दल झटपट निर्णय घेणं सोपं नाही. बहुतेक रिअल इस्टेट एजंट त्यांच्या घरात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या खरेदीदारांना विविध ऑफर देत असतात. जवळपास सर्व प्रकारच्या सुविधा ह्या नवीन घरांमध्ये उपलब्ध असतातच, सोबतच सगळ्याच गोष्टी नवीन असल्याने त्याच्या देखभालीचा खर्च सुद्धा तसा कमीच येतो, या कारणाने बिल्डर कडून नवीन फ्लॅट खरेदी करणे हा एक चांगला निर्णय ठरू शकतो.

काय सांगता! मुंबईत म्हाडाची घरे भाड्याने मिळणार; येथे क्लिक करून पहा म्हाडा कोणत्या सवलती देणार..!

नवीन घर घेण्याचे तोटे : नवीन फ्लॅट किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा सर्वात मोठा तोटा हा आहे की त्याची किंमत जुन्या फ्लॅटपेक्षा ही जास्त असते. तुम्ही खरेदी करणार असलेली नवीन प्रॉपर्टी ही अंडर डेवलेपमेंट क्षेत्रात येत असल्याने ती पूर्णपणे विकसित होण्यासाठी कमीत कमी ४-५ वर्षे तर सहजच लागतील. त्याचवेळी दुसरीकडे, जुनी प्रॉपर्टी किंवा फ्लॅट खरेदी करणे हे नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्यापेक्षा कमी खर्चाचे ठरू शकते, परंतु यामधे देखील इतर समस्या उपस्थित होतातच.

जुनेच घर खरेदी करावे का? : जुने किंवा पुन्हा विकण्यासाठी असलेला फ्लॅट किंवा घर खरेदी करणे म्हणजे जास्त देखभाली सोबतच दुरुस्तीचा खर्च सुद्धा अधिक असेल. या बरोबरच जुना फ्लॅट अनेक वेळा विकला गेला असल्याने त्या फ्लॅटच्या कागदपत्रांमध्ये घोळ किंवा तफावत निर्माण झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. जर तुम्ही भाड्यातून निर्माण होणारे उत्पन्न मिळवण्यासाठी घर खरेदी करत असाल, तर जुना फ्लॅट खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. असे असले तरी मात्र जुने घर खरेदी करण्यापूर्वी फ्लॅटच्या बांधकामाची गुणवत्ता आणि कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्या. तुम्ही जिथे कुठे फ्लॅट विकत घेण्याचा विचार करत असाल, तर सगळ्यात आधी, त्या जागेच्या आसपासचा परिसर आणि त्या ठिकाणी उपलब्ध वाहतुकीच्या साधनांबद्दल अवश्य जाणून घ्या.

फक्त एवढे पैसे भरा आणि पुण्यात म्हाडाचा फ्लॅट घ्या; फक्त येथे करा एक कॉल..!

Leave a Comment