मुंबईकरांनो! तयारीला लागा; आता पुन्हा एकदा स्वस्तात म्हाडाचे घर घेण्याची संधी, पहा लॉटरी कधी?

मुंबई : नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि या नवीन वर्षात मुंबईत हक्काचे घर (2 bhk flat Mumbai) घेण्याचा विचार करत असाल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच आनंदाची बातमी आली आहे. आता तुम्हाला या नवीन वर्षात मुंबईत म्हाडाचे घर (Mhada Flats Mumbai) घेण्याची संधी मिळणार आहे. कारण आता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ऑगस्ट महिन्यामध्ये काढलेल्या 4 हजार 82 एवढ्या घरांच्या लॉटरीनंतर आता पुन्हा एकदा 600 पेक्षा जास्त घरांची लॉटरी काढण्यासाठी म्हाडा कडून तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला आता म्हाडाचे घर किफायतशीर दरात (Affordable Mhada Flats) घेण्याची पुन्हा संधी मिळणार आहे. त्यासाठी संपूर्ण बातमी वाचा..

Mhada Flats Mumbai

ऑगस्ट महिन्यात काढण्यात आलेल्या लॉटरीमधील अर्जदारांकडून परत करण्यात आलेल्या 600 घरांचा पुढील लॉटरीमध्ये समावेश करण्यात आला असून ही लॉटरी एप्रिल महिन्यात काढण्यात येणार आहे. तसेच अजून काही घरे या पुढील लॉटरीमध्ये घेता येतील का? यासंदर्भात म्हाडाकडून चाचपणी केली जात आहे.

मुंबईकरांनो! संधी सोडू नका; ज्यांच्याकडे हक्काचं घर नाही अशा लोकांसाठी अल्पदरात घरं, येथे क्लिक करून पहा बातमी..

अलीकडे आता म्हाडाकडून लॉटरीसाठी नवीन संगणकीय प्रणाली वापरण्यात येत आहे. या नवीन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण तसेच पात्रता निश्चित झाल्यानंतरच अर्जदार लॉटरीप्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत. मंडळाकडून लॉटरी पश्चात प्रक्रिया देखील ऑनलाइन करण्यात आली आहे.

मुंबईतील या लोकांना लागली घरांची लॉटरी, यात तुमचे नाव आहे का? येथे क्लिक करून पहा..

आता म्हाडाकडून पुढील सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये (1) यशस्वी अर्जदारांना प्रथम सूचना पत्र पाठविणे, (2) अर्जदाराने 25 टक्के विक्री किमतीचा भरणा करण्याचे पत्र, (3) तात्पुरते देकार पत्र पाठविणे, (4) 75 टक्के रक्कम गृहकर्जामार्फत उभारण्याकरिता ना-हरकत प्रमाणपत्र देणे, (5) ताबा पत्राची प्रत (copy) संबंधित कार्यकारी अभियंता यांना पाठविणे, (6) मुद्रांक शुल्काचा भरणा करणे, (7) ताबा पत्र देणे ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन झाली आहे. प्रक्रियेत काही महत्वाचे बदल करण्यात आल्याने बनावट, खोटी कागदपत्र बनविणाऱ्यांना चाप बसणार आहे, तसेच नागरिकांची फसवणूक टाळता येणार आहे.

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment