गूड न्यूज! म्हाडाचे घर घेण्याची पुन्हा एकदा संधी; लॉटरी संदर्भात मोठा निर्णय..!

Mhada Lottery 2024 : आयुष्यात प्रत्येकालाच स्वत:च्या घराची (Home) खूपच गरज असते. घराशिवाय जीवन नाही असही म्हणता येऊ शकते. कारण घरामूळे आपल्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी सिक्रेट ठेवता येतात. पण सध्याच्या काळात वाढलेल्या घरांच्या किंमती आणि महाग गृह कर्ज यामुळे सामान्यांना घर घेणे खूपच अवघड झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंबईत वन बीएचके फ्लॅट (1BHK Flat Mumbai) 50 ते 60 लाख रुपयांच्या किमतीचे आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात सामान्य परिस्थिती असलेल्या लोकांना आयुष्यभर घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. पण आता म्हाडाने तुम्हाला कमी पैशात हक्काचे घर घेण्याची पुन्हा संधी उपलब्ध करून दिली आहे.

आजच्या काळात मुंबई, पुणे आणि दिल्ली या शहरांमध्ये स्वत:चं घर विकत घेणं ही एक मोठी गोष्ट बनली आहे.  या शहरात अगदी परवडणाऱ्या घरांची (Affordable Flats) किंमत देखील आपल्याला हैराण करू शकते. पण तुम्ही जर म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केला तर म्हाडाचे परवडणारे घर तुम्हाला लागू शकते. आनंदाची गोष्ट म्हणजे म्हाडाने लॉटरीला मुदतवाढ दिल्याने आता नागरिकांना 6 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे.

मुंबईत खिशाला परवडणारं घर घ्यायचंय? येथे क्लिक करून पहा स्वस्त भागांची यादी..!

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 877 एवढ्या घरांची लॉटरी म्हाडाकडून जाहीर करण्यात आली होती. वेगवेगळ्या उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही लॉटरी आहे. या लॉटरीसाठी अर्ज करण्याची मुदत काल गुरुवारी (30 मे रोजी) रात्री संपणार होती. निवडणुकांच्या कामासाठी सरकारी कर्मचारी नियुक्त केलेले असल्याने आवश्यक कागदपत्रे मिळण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे म्हाडाने या लॉटरीला 6 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

म्हाडाच्या या लॉटरीत म्हाडा योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 2416 एवढी घरे, म्हाडाच्या विविध योजनेअंतर्गत 18, म्हाडा पीएमएवाय योजनेअंतर्गत (PMAY Scheme) 59 घरे, पीएमएवाय खासगी भागीदारी योजनेअंतर्गत 978 घरे, 20 टक्के योजनेअंतर्गत पुणे शहरामध्ये 745 तर पिंपरी-चिंचवडमध्ये 561 घरे आहेत. आता म्हाडाकडून या लॉटरीला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या दिलेली ही मुदतवाढ अंतिम असून यांच्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही. जास्तीत जास्त अर्जदारांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे म्हाडाकडून आवाहन करण्यात आले आहे.

संधी सोडू नका; मुंबईत घरांची मोठी लॉटरी, ही कागदपत्रे तयार ठेवा, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment