मुंबईकरांनो! पैसे तयार ठेवा; मुंबईत म्हाडाची 1 हजार घरांची लॉटरी, या दिवशी असणार लॉटरी..!

Mhada Lottery Mumbai 2024 : मुंबईत किफायतशीर दरात हक्काचे घर घेण्याचे स्वप्न यंदा म्हाडा पूर्ण करणार आहे. कारण आता म्हाडा मुंबईत 1 हजार घरांची लॉटरी काढणार आहे. जर यंदा तुम्हाला मुंबईत म्हाडाचे घर (Mhada Flats Mumbai) मिळवायचे असेल तर या लॉटरी बद्दल माहिती तुमच्याकडे पाहिजे. ही लॉटरी नेमकी कधी असणार? आणि म्हाडाची ही घरे मुंबईत कुठे आहे? याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

सध्या राज्यात निवडणुकांची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील नेतेमंडळी व्यस्त आहे. असे असताना सुद्धा मुंबईतील घरांचा प्रश्न मार्गी लावला जात आहे. आता मुंबईत कमी किमतीत घर घेण्यासाठी म्हाडाने तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आणली आहे.

काय सांगता! मुंबईत म्हाडाची घरे भाड्याने मिळणार; येथे क्लिक करून पहा म्हाडा कोणत्या सवलती देणार..!

या दिवशी असणार लॉटरी..

निवडणूक लक्षात घेता लागू करण्यात आलेली आचारसंहिता संपल्यावर म्हाडा आगामी लॉटरीसाठी (Upcoming Mhada Lottery) तयारी सुरु करणार आहे. यंदा लॉटरीत ज्या घरांचा समावेश करायचा आहे त्या घरांची पाहणी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत म्हाडाच्या अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटाकडून होणारी घरांची मागणी लक्षात घेता येत्या ऑगस्ट महिन्यात म्हाडाच्या तब्बल 1 हजार एवढ्या घरांची लॉटरी काढली जाणार आहे. 

फक्त एवढे पैसे भरा आणि पुण्यात म्हाडाचा फ्लॅट घ्या; फक्त येथे करा एक कॉल..!

म्हाडाने 2019 ते 2022 या काळात म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कोणतीही नवीन लॉटरी जाहीर केली नव्हती. पण त्यानंतर 2023 या वर्षात म्हाडाकडून 4 हजार 82 एवढ्या घरांची लॉटरी काढण्यात आली. आता सध्या याच लॉटरीतील विजेत्यांना घरांचे वितरण करण्यात येत आहे. 

म्हाडाकडून आतापर्यंत विजेत्यांना 2 हजार 800 एवढ्या घरांचा ताबा देण्यात आला आहे. तसेच संपूर्ण रक्कम भरलेल्या विजेत्यांना सुद्धा घरं दिली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे 2023 मधील लॉटरीतील रिक्त राहिलेल्या घरांचा समावेश यंदाच्या लॉटरीत केला जाणार आहे. जुनी घरे आणि नवीन घरे मिळून जवळपास 1 हजार घरे उपलब्ध होणार आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घरांसाठी यंदाच्याच ऑगस्ट महिन्यात लॉटरी काढली जाणार आहे.

पुण्यात फक्त 9 लाखात घ्या म्हाडाचे घर; येथे क्लिक करून पहा घराचे लोकेशन आणि कार्पेट एरिया..!

Leave a Comment