कांद्याचे दिवस पालटणार; येत्या काही दिवसात दर वाढण्याची शक्यता, पहा आजचे कांदा बाजार भाव..!

आपण बघत आहोत बर्‍याच दिवसांपासून कांद्याचे दर प्रचंड घसरलेले आहे. त्यामूळे शेतकर्‍यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. कांदा पिकावर केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी हैराण आहेत. अशा परिस्थितीत नाफेड कडून कांदा हमीभाव खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्यात आले आहे.

देशात कांद्याचे होत असलेले मोठे उत्पादन लक्षात घेता नाफेडने खरेदी वाढवली आहे. त्यामूळे कांदा दरांमध्ये वाढ होऊन शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे. कांदा खरेदीसाठी अगोदर अडीच लाख टन इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. आता ते चार लाख टनावर पोहोचले आहेत.

येथे पहा – जिगरबाज शेतकरी ! कांद्याने कर्ज बाजारी केले, शेतकर्‍याने गावात दवंडी देऊन नांदच केला..!

आता सध्याच्या परिस्थितीत नाफेडद्वारे मिळत असलेला दर 10 ते 12 च्या दरम्यान आहे. समोरील काही दिवसांमध्ये हा दर 18 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे..(Possibility of price increase in next few days)..

भाव घसरल्यामूळे शेतकर्‍यांनी कांदा शेतातच सडू दिला

गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला खूपच कमी दर मिळत असल्याने शेतकर्‍यांना याचा मोठा तोटा सहन करावा लागत आहे. जेव्हा पासून उन्हाळी कांदा बाजारात यायला सुरुवात झाली तेव्हापासून कांद्याच्या दरात सारखीच घसरण होत आहे. परिणामी काही शेतकर्‍यांनी कांदा शेतात तसाच सडू दिला आहे तर काही शेतकर्‍यांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवले आहे.

येथे पहा  – शेतकर्‍यांनो ! कमी वेळात पैसाच पैसा; शेळी पालनासाठी करा फक्त ‘या’ पाच जातींची निवड..!

आज 11 जून वार – शनिवार रोजी कांद्याला काय दर मिळाला? हे आपण जाणून घेणार आहोत. तसेच कांद्याला कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर आणि सर्व साधारण दर किती मिळाला? अशी सविस्तर माहिती देखील आपण पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजचे Live कांदा बाजार भाव..

आजचे कांदा बाजार भाव दि.11 जून 2022 वार – शनिवार

(1) येवला  :
दि. 11 जून 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 10000 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 100
जास्तीत जास्त दर – 1426
सर्वसाधारण दर – 1000

(2) लासलगाव  :
दि. 11 जून 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 8398 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1471
सर्वसाधारण दर – 1160

(3) राहूरी – वांबोरी :
दि. 11 जून 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 3916 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 100
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 800

(4) कळवण  :
दि. 11 जून 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 2000 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 300
जास्तीत जास्त दर – 2050
सर्वसाधारण दर – 1400

(5) कोल्हापूर  :
दि. 11 जून 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 6540 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 700
जास्तीत जास्त दर – 1700
सर्वसाधारण दर – 1200

आजचे सर्व कांदा बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..

आजचे कांदा बाजार भाव

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या..धन्यवाद..