कांद्याला झळाळी येणार, या महिन्यात कांद्याला मिळणार दुप्पट दर..!

Onion News : सध्या कांद्याच्या दरामध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. मोठ्या न्यूज चॅनेलने दिलेल्या बातमीनुसार सप्टेंबर महिन्यात कांद्याचे दर (Onion Rates) दुप्पट होण्याची मोठी शक्यता आहे. अशी शक्यता कांदा व्यापाऱ्यांनी देखील व्यक्त केली आहे. दर्जेदार कांद्याच्या दरामध्ये सप्टेंबरमध्ये दुप्पट वाढ होऊ शकते असा अंदाज आहे.

जे कांदा उत्पादक शेतकरी आहे ही बातमी त्यांच्यासाठी खूपच दिलासादायक आहे. सप्टेंबर (September) महिन्यात कांद्याच्या दरामध्ये चांगली वाढ झाल्यास कांदा उत्पादक शेतकर्‍यांना (Farmers) चांगला फायदा होणार आहे.

सप्टेंबरपर्यंत कांद्याच्या किंमतीमध्ये जवळपास दुप्पट वाढ (Double increase) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील महिन्यात कांद्याचे दर 55 ते 60 रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकतात, अशी माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे. देशात सध्या कांद्याचा पुरेल असा साठा आहे. पण मोठ्या प्रमाणात कांदा खराब देखील झाला आहे. त्यामुळे चांगली क्वालिटी असणारा कांदा दुप्पट महाग होण्याची शक्यता आहे.

येथे वाचा – घरकूल मिळत नसेल तर या नंबर वर करा कॉल, तुम्हालाही मिळू शकते घर..!

सध्या नाशिक मध्ये कांद्याचे घाऊक भाव 5 रुपये किलो ते 24 रुपये किलो असे आहेत. तर किरकोळ मार्केटमध्ये कांद्याचे दर हे 25 ते 35 रुपये प्रति किलो असे आहेत. वातावरणात बदल झाल्याने कांदा पिकाला मोठा फटका बसलेला आहे. आणि बर्‍याच भागात झालेल्या जोरदार पावसाचाही पिकावर मोठा परिणाम झाला आहे. काही भागात तर साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाल्याच्या बातम्या आल्या आहे.

Leave a Comment