कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता, पहा या मागील कारण..!

सर्व शेतकरी मित्रांचं शेती विषयक माहिती देणार्‍या आपल्या Read Marathi या न्यूज पोर्टल वर मनापासून स्वागत. मित्रांनो आज आपण कांदा बाजार भावांबाबत माहिती घेणार आहोत, त्यासोबतच भविष्यात कांदा बाजार भावाची परिस्थिती काय असेल? याची देखील थोडक्यात माहिती पाहणार आहोत. (Onion prices likely to rise, See the reason behind this)…

कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता, हे आहे कारण..

मित्रांनो, सध्या राज्यात कुठे ना कुठे पाऊस तडाखा देत आहे, त्यामूळे रब्बीच्या पिकांचे यामुळे खूप नुकसान झाले आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. यामध्ये हरभरा, गहू आणि कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. कायद्यांचे मोठे उत्पन्न घेणार्‍या जिल्ह्यांमध्ये गारपीट व अवकाळी पावसाने मोठी नासाडी केली.

हे पण वाचा

सोयाबीन करणार शेतकऱ्यांना मालामाल, पहा आज काय मिळतोय दर..!

राज्यात नाशिक व अहमदनगर मध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. राज्यात गारपिटीचा सर्वात मोठा तडाखा नाशिक जिल्ह्याला बसला, त्यामूळे येथील कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. देशातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणार्‍या काही राज्यांनाही याचा फटका बसला.

काही जाणकारांच्या मते येत्या काही दिवसात अवकाळी पावसाचं पुन्हा संकट येण्याची शक्यता आहे, जर अवकाळी पावसाने पुन्हा नासाडी केली तर कांद्याच्या उत्पादनात मोठी घट येईल आणि कांद्याचे बाजार भाव वाढलेले आपल्याला दिसतील अस काही जाणकार सांगत आहे.

हे आहेत आजचे कांदा बाजार भाव

आजचे कांदा बाजार भाव दि. 13 मार्च 2022 वार – रविवार

(1) पुणे – मोशी  :
दि. 13 मार्च 2022 (वार – रविवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 435 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 1500
सर्वसाधारण दर – 950

आजचे सर्व ताजे कांदा बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे कांदा बाजार भाव

Kanda Bajar bhav 13-03-2022 Sunday

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.