कांदा दर सप्टेंबरमध्ये कसे राहतील? पहा अभ्यासकांनी काय सांगितले..!

Onion Rates in September : सध्या टोमॅटोच्या बाजार भावाची चर्चा सोशल माध्यमांमधून हळूहळू कमी होत असताना आता कांदा बाजार भावाच्या चर्चेने जोर धरल्याचं चित्र आहे. देशामधील बाजारात कांदा भाव (Onion Rates) सुधारत आहे. कांद्याच्या भावाने आता 2 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. तर किरकोळ बाजारामध्ये कांद्याचे भाव 40 रुपयांच्या पुढे सरकले आहे. अशातच नाफेड स्टाॅकमध्ये असलेला माल विकणार असल्याची चर्चा रंगली आहे. परिणामी कांद्याचे भाव काही प्रमाणात कमी झालेले दिसतात. 

बाजारातील कांद्याची आवक कमी झालेली आहे. सध्या देशामध्ये मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला आहे. दरम्यान बांगलादेशमधून मागणी वाढली असल्याचं दिसतय. कांद्याची निर्यात देखील सुरु आहे. दुसरीकडे जर पाहिले तर आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मधील खरिप कांदा एक महिना लेट असल्याचं सांगण्यात येत आहे. परिणामी महाराष्ट्रामधील कांद्याला मागणी वाढली आहे. पण राज्यातील बाजार पेठेत कांदा कमी येत आहे. याच कारणामुळे सध्या कांद्याचे भाव वाढले आहे. राज्यातील महत्वाच्या बाजार पेठेत कांद्याने 2 हजार 300 रुपयांचा टप्पा पार केला होता.

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस धो-धो पाऊस कोसळणार, पंजाबराव डख यांचे मोठे भाकीत, येथे क्लिक करून पहा बातमी..

काय असेल सप्टेंबरमधील चित्र

या वर्षीचा खरिपाच्या मालाला एक महिना उशीर झालेला आहे. त्यातच बर्‍याच भागामध्ये लागवडी देखील उशीरा झाल्या आहे. जुलैमध्ये झालेला अतिपाऊस आणि चालू ऑगस्ट महिन्यात पावसाचा पडलेला खंड यामुळे कांदा पिकावर परिणाम होऊ लागलेला आहे. हे लक्षात घेता पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये कांद्याच्या भावामध्ये आणखी वाढ होऊ शकते. अभ्यासकांच्या मते कांदा भाव 3 हजार ते 4 हजार रुपयांचा देखील टप्पा गाठू शकतात.

आजचे कांदा बाजार भाव दि.19 ऑगस्ट 2023

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/08/2023
कोल्हापूरक्विंटल6113100024001600
अकोलाक्विंटल390150028002500
औरंगाबादक्विंटल282025019501100
चंद्रपूर – गंजवडक्विंटल405200035002500
खेड-चाकणक्विंटल2000100023001800
हिंगणाक्विंटल3200020002000
कराडहालवाक्विंटल249200025002500
सोलापूरलालक्विंटल2099410032001300
बारामतीलालक्विंटल71150025002000
धुळेलालक्विंटल181215022001800
जळगावलालक्विंटल76242720621357
उस्मानाबादलालक्विंटल4150028002150
पंढरपूरलालक्विंटल50330027001700
नागपूरलालक्विंटल700150023002100
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल414150026001550
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल24110024001750
पुणे-मोशीलोकलक्विंटल705120022001700
जामखेडलोकलक्विंटल24730023501325
नागपूरपांढराक्विंटल700240030002850
येवलाउन्हाळीक्विंटल900020022591800
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल600030023111950
लासलगावउन्हाळीक्विंटल1261860024002050
लासलगाव – निफाडउन्हाळीक्विंटल1500100022052050
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल4000100024002100
सिन्नर – नायगावउन्हाळीक्विंटल90920024002000
कळवणउन्हाळीक्विंटल1110050027602200
चांदवडउन्हाळीक्विंटल1100020023051980
मनमाडउन्हाळीक्विंटल350040023752000
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2390070030012201
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल678060024502050
भुसावळउन्हाळीक्विंटल8100016001200
वैजापूरउन्हाळीक्विंटल280145025001750

Leave a Comment