कांदा पुन्हा रडवणार, ‘हे’ कारण आलं समोर..!

कांद्याने शेतकर्‍यांना आधीच रडवलं असताना आता परत एकदा कांदा पुन्हा रडवेल अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. यामागचं नेमकं तज्ञांनी सांगितलेलं कारण काय आहे? हे आपण या बातमी मध्ये जाणून घेणार आहोत. (Onion will cry again, ‘this’ reason has come to the fore ..!)

कांद्याचा भूतकाळ रडवणारा

कांद्याचा एक महिन्यापूर्वीचा भूतकाळ जर बघितला तर शेतकर्‍याला रडवणारा आपल्याला दिसून येतो. सुरवातीला अवकाळी पावसाने आणि गारपिटीने कांद्याचे मोठे नुकसान केले होते. शेतकरी जेमतेम त्यामधून उभा राहिला असताना कांद्याच्या दरांमध्ये दीड हजार ते 2 हजार रुपयांपर्यंत मोठी घसरण झाली आणि कांदा कवडीमोल विकला जाऊ लागला त्यामूळे शेतकर्‍यांनी कांद्या वर केलेला खर्च काढणे देखील कठीण होऊन बसले. गेल्या 10 ते 15 दिवसांपासून कांद्याचे दर सारखे असल्यामूळे शेतकर्‍यांची चिंता वाढलेली आहे. अशातच परत एकदा शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पाडणारी बातमी समोर येत आहे.

येथे पहा आजचे कांदा बाजार भाव

‘या’ कारणामूळे कांदा पून्हा रडवू शकतो

मार्चचा महिना सुरू आहे. हा महिना आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना समजला जातो. त्यामूळे या महिन्यात वर्ष भराची रखडलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असतो. अशातच आता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या नावाखाली नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या काही दिवस बंद असणार असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. त्यामूळे शेतकर्‍यांचा कांदा काही दिवस पडून राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जेव्हा बाजार समित्या सुरू होतील तेव्हा कांद्याची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली असेल आणि त्यामूळे कांद्याचे दर अजूनच खाली येतील अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.

येथे पहा आजचे कांदा बाजार भाव

कांदा एका ठिकाणी पडून राहील्यामूळे खराब होण्याची भीती आहे तर दुसरीकडे कांद्याचे दर उतरण्याची भीती असं दुहेरी संकट सध्या बळीराजा समोर उभं आहे. जर कांद्याचे दर पुन्हा उतरले तर शेतकर्‍यांना मोठे नुकसान सोसावे लागू शकते, असं मत एका प्रतिष्ठित शेतकऱ्याने व्यक्त केले आहे.

शेतमालाचे बाजार भाव, हवामान अंदाज, कृषी योजना आणि शेती विषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

Leave a Comment