बाप रे! बनावटी खत आणि उत्पादनात घट; ‘या’ पद्धतीने ओळखा ओरिजिनल आणि बनावटी खत..!

शेअर करा

ReadMarathi.Com : अलीकडे आपण बघतो की खाण्या-पिण्याच्या पदार्थांसह इतर सर्वत्र भेसळ केली जाते. भेसळ करून जास्त नफा कमावणे हा त्यामागचा उद्देश असतो. पण वैयक्तिक स्वार्थासाठी ग्राहकाच्या जीवाची पर्वा न करता किंवा ग्राहकाने दिलेल्या मोबदल्याचा विचार न करता सर्रासपणे हा लुटमारीचा खेळ सुरू असतो. आपल्या स्वार्थासाठी भेसळयुक्त पदार्थ/माल ग्राहकाला विकणे हा गुन्हा आहे.

विशेष म्हणजे नेहमी कर्जाच्या विळख्यात असलेला शेतकरी जेव्हा या संकटात सापडतो तेव्हा त्याचे कर्जातून बाहेर पडणे जवळपास अशक्य होऊन बसते. बनावटी बियाणे आणि खतांमूळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाल्याच्या बातम्या आपण अनेक वेळा ऐकल्या/वाचल्या आहेत. त्यामूळे शेतकरी बांधवांनी बियाणे आणि खतं विकत घेताना सावधगिरी बाळगली पाहिजे. या लेखात आपण खतं विकत घेताना बनावटी आणि ओरिजिनल खत कसं ओळखायचं हे जाणून घेणार आहोत.

गेल्या 3 ते 4 दिवसांपासून राज्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामूळे संपूर्ण राज्यात शेतीच्या कामाला वेग आलेला आहे. बर्‍याच भागात पेरण्यांची कामे आटोपली आहेत तर काही ठिकाणी अजून सुरू आहे. पेरणी करत असताना किंवा पिके उगवून आल्यानंतर पिकांच्या वाढीसाठी शेतकरी महागडे खतं द्यायला मागे येत नाही. जर शेतकरी बनावटी खताचा शिकार झालेला असेल तर त्याला हवा तसा रिजल्ट मिळत नाही. त्यामूळे पिकाला भरमसाठ खतं देऊनही उत्पादनात मोठी घट येते. शेतकरी पेरणी करत असताना डीएपी आणि युरिया खतं मोठ्या प्रमाणात वापरतात. त्यासाठी बनावटी खतं ओळखणे गरजेचे आहे.

येथे वाचा – कापसाच्या बंपर उत्पादनासाठी असे करा कपाशीचे खत व्यवस्थापन..!

असे ओळखा बनावटी खत

डीएपी खतं बनावटी आहे की ओरिजिनल हे ओळखण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. डीएपी खताचे काही दाणे हातावर घेऊन त्याला चुना लावा आणि थोडा वेळ त्याला हातावर तंबाखू प्रमाणे चोळा. जर खत ओरिजिनल असेल तर त्याचा प्रचंड वास येईल. हा वास असा असेल की घ्यायला देखील जमणार नाही. असे झाल्यास हे खत ओरिजिनल आहे असे समजा.. डीएपी बनावटी खताचे दाणे नखाने सहज तुटतात, डीएपी ओरिजिनल खत असेल तर नखाने दाणे तोडणे लवकर शक्य होत नाही..

युरिया ओरिजिनल खत पाण्यात पूर्णपणे विरघळते, खत पूर्णपणे विरघळल्या नंतर खताचे लिक्विड थंड लागते. बनावटी युरिया अजून दुसर्‍या पद्धतीने देखील तपासतात. बनावटी युरिया आहे की ओरिजिनल हे तपासण्यासाठी तव्यावर युरिया गरम करून बघितलं जातं. जर गरम तव्यावर युरिया वितळत नसेल तर तो युरिया बनावटी असू शकतो.

येथे वाचा – सोयाबीनसाठी पहिली फवारणी ही घ्या, खोड माशी आणि चक्री भुंगा होईल गायब..!

या पद्धतीचा वापर करून शेतकरी बांधव आपल्या पिकाला देत असलेले खतं ओरिजिनल आहे की बनावटी याचा अंदाज घेऊ शकतात…