पाकिस्तान सरकार ने घेतला मोठा निर्णय; भारता सोबत करणार अशा पध्दतीने आर्थिक व्यवहार..!

मुंबई : पाकिस्तान द्वारे होत असलेले दहशतवादी हल्ले व घुसखोरी या मुळे दोनही देशांच्या आर्थिक व्यवहारांवर याचा परिणाम होतांना दिसून येतो. देश स्वातंत्र्य झाल्यापासून जम्मु-काश्मिर या विषयावरुन भारत आणि पाकिस्तान वाद मिटण्याचे चिन्ह काही दिसत नाही. त्यामुळे याचा परिणाम थेट दोन्ही देशांच्या आर्थिक व्यवहारांवर पहायला मिळतो.

पुलवामा दहशतवादी हल्ला आणि जम्मु-काश्मिर ला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 या दोन विषया वरुन दोनही देशाचे राजकिय व आर्थिक संबंध खराब झाले होते. भारत सरकारने जम्मु आणि काश्मिरला विशेष दर्शवणारे कलम 370 रद्द केल्याने पाकिस्तान मध्ये अंगार लागल्याचे पहायला मिळाले होते. सध्य परिस्थिती लक्षात घेत दोनीही देश आर्थिक व्यवहारा बाबतचे आपआपले निर्णय घेत असतात.

पाकिस्तान सरकारने भारतातून पाकिस्तान मध्ये आयात होणाऱ्या औषधांवर निर्बंध आणले होते पण कोरोना संकटाचा विचार करत पाकिस्तान सरकारने निर्बंध हटवले आणि भारतातून औषधं आयात करण्यासंदर्भात परवानगी दिली.

पाकिस्तानातील आर्थिक सल्लागार यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सोबत बैठक घेतली. पाकिस्तान मध्ये कापसाच्या दराने आसमान गाठले आहे. याच संदर्भात ती बैठक पारपडली. या बैठकीनंतर दोन्ही देशांमध्ये कापूस आणि साखरेची आयात निर्यात करण्यासंदर्भात निर्णय झाल्याचं दिसत आहे. याला पाकिस्थान च्या मंत्रीमंडळाने देखील मंजुरी दिली आहे. पाकिस्थान भारताकडून जून पर्यंत कापूस आयात करेल. आणि साखर आयात करण्यासंदर्भात देखील लवकरच निर्णय होईल अशी सुचना पाकिस्तानी मीडियाने दिली आहे.

Leave a Comment