पंजाब डख हवामान अंदाज : राज्यात ‘या’ तारखेला पावसाची शक्यता, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली..!

हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंजाब डख यांचा अतिशय महत्वाचा हवामान अंदाज, राज्यात 6 मार्च ते 9 मार्च दरम्यान तुरळक पावसाची शक्यता, काय म्हणाले पंजाब डख? वाचा सविस्तर…(Panjab Dakh Havaman Andaj : Chance of rain in the state on this date)..

पंजाब डख हवामान अंदाज (Panjab Dakh Havaman Andaj)

राज्यात 25 दिवस ते 30 दिवसांच्या अंतरामध्ये पाऊस सतत हजेरी लावण्याचे काम करत आहे. त्यामूळे शेतकऱ्यांसाठी ‘हा’ पाऊस डोके दुखी ठरत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील वातावरण ढगाळ व धुक्याचे झाले होते, त्यामूळे हरभरा उत्पादनाला याचा मोठा फटका बसला आणि शेतकर्‍यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. अलीकडेच शेतकऱ्यांनी हरभरा काढणीला सुरुवात केलेली आहे आणि अजून बर्‍याच शेतकर्‍यांचे हरभरा पीक शेतात आहे.

ज्या शेतकर्‍यांचे हरभरा पीक शेतात आहे अशा शेतकर्‍यांची चिंता आता वाढण्याची शक्यता दिसत आहे. शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी हवामान तज्ञ पंजाब डख यांनी नुकताच ‘पंजाब डख’ नावाच्या त्यांच्या YouTube चॅनेल वर हवामान अंदाजाचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे.

त्यामध्ये त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही भागात 3 मार्च ते 5 मार्च दरम्यान ढगाळ वातावरण असणार आहे आणि 6 मार्च ते 9 मार्च या काळात तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याअगोदर शेतातील हरभरा पीक शेतकर्‍यांनी घरी आणावे असा मोलाचा सल्ला पंजाब डख यांनी शेतकर्‍यांना दिलेला आहे. बंगालच्या खाडीमध्ये 5 मार्च रोजी चक्रीवादळ तयार होणार असून ते वादळ 6 मार्च रोजी तामिळनाडूच्या किनारपट्टी वर धडकणार आहे, त्यामूळे 6 मार्च रोजी तामिळनाडू राज्यात पाऊस होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. याची शेतकर्‍यांनी नोंद घ्यावी…

शेतमालाचे ताजे बाजार भाव, हवामान अंदाज आणि शेती विषयक सर्व माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

1 thought on “पंजाब डख हवामान अंदाज : राज्यात ‘या’ तारखेला पावसाची शक्यता, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली..!”

Leave a Comment