बाप रे! आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता, पहा पंजाब डक काय म्हणाले?

शेतकरी मित्र सध्या आपल्या शेतीच्या कामात व्यस्त झाले आहे. 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीची कामे पूर्णपणे रखडली होती. अनेक शेतकरी बांधवांच्या शेतातील शेतमालाची क्वालिटी पावसामुळे दुय्यम दर्जाची झाली आहे. काही शेतकर्‍यांच्या शेतातील सोंगूण टाकलेल्या सोयाबीन आणि मकाला कोम फुटले आहेत. त्यामूळे शेतकरी बांधवांच्या अशा प्रकारच्या शेतमालाला दर देखील कमी मिळण्याची शक्यता आहे. त्यामूळे परतीच्या पावसाने जाताजाता शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान करून ठेवले आहेत. अशातच महाराष्ट्राचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक साहेब यांनी आपला हवामान अंदाज व्यक्त केला आहे.

येथे वाचा – लय भारी निर्णय! आता ‘या’ शेतकर्‍यांना देखील मिळणार अतिवृष्टीची मदत, दिवाळी झाली गोड..!

आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस

महाराष्ट्रात आपल्या अचूक हवामान अंदाजाने प्रसिद्ध असलेले पंजाबराव डक साहेब यांनी फोन कॉलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना अतिशय महत्वाचा संदेश दिला आहे. त्यांनी काल 13 ऑक्टोबरला पावसाचा अंदाज व्यक्त केला होता तसेच आज 14 ऑक्टोबर आणि उद्या 15 ऑक्टोबर या तीन दिवसांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. शेतातील महत्वाची कामे सुरू असल्यामूळे हा अंदाज अतिशय महत्वाचा समजला जात आहे.

पंजाबराव डक साहेब यांनी आज आणि उद्या समोरील जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यात मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, सिल्लोड, वैजापूर, लातूर, परभणी, पैठण तसेच पुणे, मुंबई, कोकण, शिर्डी, राहुरी, कोल्हापूर, बुलढाणा, खामगाव, अमरावती, अकोला, बार्शी आणि अकलूज या जिल्ह्यांमध्ये व शहरांमध्ये पावसाचा अंदाज आहे.

‘या’ तारखेपासून पाऊस कमी होणार

पंजाबराव डक साहेब यांनी फोन कॉलच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार 16 ऑक्टोबर पासून राज्यात पाऊस कमी होणार आहे. तसेच त्यांनी राज्यात थंडीला कधी पासून सुरुवात होईल याची माहिती देखील दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 ऑक्टोबर पासून राज्यात थंडी जाणवायला सुरुवात होणार आहे. शेतकरी बांधवांनो हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामूळे ही बातमी इतर शेतकर्‍यांना देखील शेअर करा..