शेतकर्‍यांनो पेरणी करताय? पंजाब डख यांची शेतकर्‍यांना विनंती; पहा 2 जुलै पर्यंतचा नवीन हवामान अंदाज..!

सध्या राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी तो अजून सक्रिय झालेला नाही, अशी चर्चा सुरू आहे. राज्याच्या बर्‍याच भागात आत्तापर्यंत पावसाने हजेरी लावली आहे, पण हा पाऊस दडी तर मारणार नाही ना? अशा प्रश्नाने शेतकरी अस्वस्थ झाला आहे.

नांदेड जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांवर तर पिकाला हाताने पाणी देण्याची वेळ आली आहे. येथील काही शेतकर्‍यांनी 1 ते 2 आठवडाभरापूर्वी पेरणी केली होती आता ही पिके धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे शेतकर्‍यांजवळ असलेला जलसाठा देखील संपू लागला आहे. अशी परिस्थिती नांदेडसह, परभणी, हिंगोली आणि जालना या भागात देखील मोठ्या प्रमाणात आढळत आहे.

येथे वाचा  – यंदा सोयाबीन पेरत असाल तर अशा पद्धतीने करा सोयाबीन मधील तणाचा नायनाट..!

ही सर्व परिस्थिती लक्षात घेता काही शेतकर्‍यांनी पेरणीसाठी हात आखडता घेतला आहे. कर्ज काढून विकत आणलेले बियाणे आणि खते वाया जावू नये म्हणून काही शेतकर्‍यांनी सावध पवित्रा घेतला आहे. पण असं असलं तरी पंजाब डख यांच्या नुकत्याच जाहीर झालेल्या नवीन हवामान अंदाजाने मात्र शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे. त्यांनी आपल्या अंदाजात 2 जुलै पर्यंतचा पावसाचा प्रवास कसा असेल हे सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊया पंजाब डख नेमके काय म्हणाले..

येथे वाचा  – कापूस लागवड करताय? मग हे तण नाशक फवारा आणि करा तणाचे व्यवस्थापन..!

पंजाब डख यांच्या नवीन अंदाजानुसार राज्यात असा असेल पाऊस

पंजाब डख यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार 19 जून पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे, हा पडत असलेला पाऊस मॉन्सूनचाच असणार आहे. ते पुढे म्हणाले की 19 जून ते 2 जुलै दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे. आणि काही भागात पेरणी योग्य पाऊस पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आणि विशेष म्हणजे हा पाऊस 2 जुलै पर्यंत संपूर्ण राज्य व्यापणार आहे असही ते म्हणाले..

येथे वाचा – शेतकऱ्यांनो जीव महत्वाचा; विजांपासून वाचण्यासाठी हे ॲप करणार मदत, वाचा संपूर्ण माहिती..!

अधिक माहिती देताना ते म्हणाले की राज्यात 23, 24, 25, 26 आणि 27 जून दरम्यान मोठा पाऊस पडणार आहे. पेरणी करणार्‍या शेतकर्‍यांना त्यांनी एक विनंती केली आहे. जे शेतकरी पेरणी करत आहे अशा शेतकर्‍यांनी आपल्या शेत जमिनीची ओल तपासूनच पेरणी करावी. जर शेतामध्ये हाताची चार बोट ओल असेल तर पेरणीचा निर्णय घेऊ नका असं पंजाब डख म्हणाले..

Leave a Comment