बाप रे! घर विकत घेण्यासाठी लोकांनी लावली रांग; घराची किंमत पाहून उडतील हौश..!

2 bhk flat in Pune : स्वतःच हक्काचं घर असायला पाहिजे, अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. त्यामुळे घर विकत घेण्यासाठी बरीच लोक कर्ज घेत असतात, त्यांना दागिने गहाण ठेवावी लागतात, नोकर-व्यवसाय असून देखील काही लोकांना हक्काचे घर घेण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. कारण मुंबई सारख्या ठिकाणी वन बीएचके घर (1 BHK Flat Mumbai) सुद्धा प्रचंड महागले आहे. काही लोक हक्काचं घर विकत घेण्यासाठी जे जमेल ते करायला तयार असतात. पण, असं तुम्ही कधी ऐकलंय का की, घर विकत घेण्यासाठी चक्क 8 तास रांग लावण्यात आली आहे. अजिबात ऐकलं नसेल आणि पाहिलं देखील नसेल.. असं पहिल्यांदा घडलं असं तुम्ही म्हणू शकता. पुण्यात घर विकत घेण्यासाठी लोकांनी चक्क 8 तास रांग लावल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आणि विशेष म्हणजे या घराची किंमत पाहून तुमचे हौश नक्कीच उडतील.

घर घेण्यासाठी रांगा लावलेला हा व्हिडीओ पुण्यातील वाकड येथील आहे आणि याठिकाणी रस्त्यावर लोकांची गर्दी झालेली दिसत आहे. रस्त्यावरील ही लांबवर गेलेली रांग लहान नाही, तर चक्क 15 किलोमीटर अंतरापर्यंत एवढी लांब रांग चक्क 8 तास सुरू होती, अशी देखील माहिती मिळाली आहे.

अरे व्वा! आता तुम्ही देखील घेऊ शकता 1 कोटीचे घर, फक्त वापरा ही ट्रिक, येथे क्लिक करून पहा बातमी..

एवढी आहे फ्लॅटची किंमत (Flat Price)

अलीकडच्या काळात दिवसेंदिवस घराच्या किमतींमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. मुंबई आणि पुणे यासारख्या मोठ्या शहरात घर घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील वाकड येथील हा व्हिडीओ खूप व्हायरल होऊ लागला आहे. यात आश्चर्याची गोष्ट अशी की दीड ते दोन कोटी एवढी किंमत असलेल्या या महाग घरांच्या खरेदीसाठी इच्छुक असलेल्या लोकांनी लांबच लांब अशी जवळपास 15 किलोमीटरपर्यंत रांग लावली होती. खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही याचा व्हिडीओ सुद्धा पाहू शकता..

https://x.com/UpdateChaser/status/1717765895236534504?s=20

Leave a Comment