गूड न्यूज! सामान्य लोकांना पुढील वर्षात मिळणार 1 लाख घरे; म्हाडा काढणार मोठी लॉटरी, पहा बातमी..!

Mhada Flats : सामान्य लोकांना स्वस्तात हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असते. म्हाडाच्या माध्यमातून ही घरे उपलब्ध करून दिले जाते. येत्या वर्षभरात वेगवेगळ्या गृहनिर्माण योजनेंतर्गत जवळपास 1 लाख घरे सामान्य लोकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी महत्वाची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केली आहे.

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या माध्यमातून सदनिका संगणकीय सोडतची आयोजन जिल्हा परिषद येथे करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी ही महत्वाची माहिती दिली. सावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नागरिकांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न (Home Dream) पूर्ण करण्याकरिता ‘सर्वांना घरे’ देण्याची संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून मांडण्यात आली आहे. त्यानुसार सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार (Government) मिळून प्रधानमंत्री आवास योजना तसेच म्हाडा सारख्या योजनांच्या (Mhada Housing Scheme) माध्यमातून नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

पुणे म्हाडाच्या सोडतीमध्ये उपलब्ध असलेल्या सदनिकांच्या तुलनेत जवळपास दहापटीने अर्ज आले आहे. म्हाडाकडून आतापर्यंत लोकांना 5 लाख 14 हजार घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. म्हाडाची सोडत (Mhada Lottery) प्रक्रिया ऑनलाईन आहे तसेच अतिशय पारदर्शक देखील आहे, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी माहिती देखील त्यांनी दिली..

मोठी संधी! मिळवा घर, प्लॉट, दुकान; सिडकोची लॉटरी जाहीर, येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती..

मुंबई मधील सुमारे 75 हजार गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. पुढील काळात देखील वेगवेगळ्या उत्पन्न गटामधील लोकांना परवडणारी घरे (Affordable Flats) उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच पुढील काळात म्हाडाची सोडत (Mhada Lottery) वर्षातून दोन वेळेस घेण्यासाठी म्हाडानी प्रयत्न करावे असं देखील सावे म्हणाले. 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेच्या (Housing Scheme) माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना परवडणारी घरे देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच पुणे विभागामध्ये विविध गृहनिर्माण योजनेसाठी सरकारी भूखंड उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांनी गती देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना सावे यांच्याकडून देण्यात आल्या.

बाप रे! एका अटीमुळे म्हाडाची घरे मिळण्यास अडचण; सरसकट घरे देण्याची मागणी..!

Leave a Comment