PM Awas Scheme
पंतप्रधान आवास योजनेत छत्रपती संभाजीनगर शहरातील पडेगाव, तीसगाव, हर्सूल तसेच सुंदरवाडी याठिकाणी महापालिकेकडून घरे बांधण्यात येणार आहे. महापालिकेकडे 40 हजार एवढ्या लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत. लाभार्थ्यांना घर नेमकं कुठे घ्यायचंय, यासाठी चॉईस फाॅर्म भरून द्यावा लागणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पडेगाव जर सोडले तर इतर चार ठिकाणच्या कंत्राटदारांनी महापालिकेकडे सेक्युरिटी डिपॉझिटची रक्कम भरून दिली आहे.
काय सांगता! ही एक आयडिया घर खरेदी करताना वाचवेल लाखो रुपये, येथे क्लिक करून पहा बातमी..
पडेगावच्या कंत्राटदाराला देखील सेक्युरिटी डिपॉझिट भरण्याची सूचना करण्यात आली आहे. आता लवकरच महापालिकेकडून कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश (वर्कऑर्डर) देण्यात येणार आहे. वर्कऑर्डर मिळाल्यानंतर कंत्राटदार नगर रचना विभागाकडे प्रस्ताव सादर करून बांधकामाची परवानगी घेतील आणू बांधकाम परवानगी घेतल्यानंतर आवास योजनेच्या कामाचा नारळ फोडला जाईल. ही प्रक्रिया सुरू असतानाच पालिकेकडून संबंधित असलेल्या विकासकाशी करारनामा करण्यात येणार आहे.