बाप रे! भाड्याने घर घेत असाल तर या गोष्टी लक्षात घ्या, अन्यथा अडकाल कायद्याच्या जाळ्यात..!

Property on rent : “नो ब्रोकर डॉट कॉम” चे को फौंडर तसेच चीफ बिझनेस ऑफिसर यांनी असे स्पष्ट केले आहे की, रियल इस्टेट क्षेत्रामध्ये नागरिकांना सतत धोका मिळत आहे व फसव्या व्यवहाराला सामोरे जावे लागत आहे. बरेच मालक आपल्या भाडेकरूंच्या असुरक्षितेचा फायदा घेतात आणि त्यांची फसवणूक करतात. भाडेकरू म्हणून तुमच्या हिताचे रक्षण करणे ही एक महत्त्वाची बाब आहे (Real Estate). तुम्ही सुद्धा ऑफलाइन, ऑनलाईन, तसेच ब्रोकर्स सोबत प्रॉपर्टी पाहत असाल तर पुढील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

अव्‍यावहारिक डील्सपासून नेहमीच सावध राहावे;

अलीकडे रियल इस्टेटच्या मार्केटमध्ये आपल्याला आवडणाऱ्या डील्सची कमतरता अजिबात भासत नाही. जरी तुम्हाला डील्स करायच्या असतील तर त्या वेळी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे (Want To Rent A House). अशावेळी नेहमीच निरीक्षण तसेच किमतींची तुलना करण्यासाठी थोडासा वेळ काढा.

खुशखबर! सरकारची नवीन योजना सुरू; आता या लोकांना मिळणार घर, येथे क्लिक करून पहा कसा करावा अर्ज?

समजूतदार सोबतच माहितीपूर्ण दृष्टिकोनाच्या माध्यमातून तुम्ही रियल इस्टेटच्या विविध लँडस्केप मध्ये नक्कीच नेविगेट करू शकता. अशावेळी फसवणूक करणाऱ्या लोकांनी रचलेल्या सापळ्यात अजिबात तुम्ही अडकणार नाही. सर्वात प्रथम तुम्ही ज्या ठिकाणी घर शोधत आहे त्या परिसरामध्ये सरासरी भाडे नक्की किती आहे? याची तपासणी करून घ्या. सोबतच त्या ठिकाणी नागरिकांना काय ऑफर दिल्या जातात याचा देखील आढावा घ्या.

स्वतः जाऊन प्रॉपर्टी चे निरीक्षण करा;

व्हर्च्युअल प्रॉपर्टी टूर आणि या सोबतच इमर्सिव्ह ऑनलाइन (Online) लिस्टिंग प्रॉपर्टी शॉर्टलिस्ट करण्याचा हा एक उत्तम आणि प्रमुख मार्ग आहे. परंतु टोकन मनी फायनल करण्या आधी याशिवाय जमा करण्याआधी तुम्ही प्रॉपर्टीची स्वतः तपासणी करावी आणि निरीक्षण करावे. खरेदी करणाऱ्या नागरिकांनी प्रॉपर्टीची स्थिती पाहून घ्याव.

आता मोठी संधी! स्वस्तात घ्या म्हाडाचे घर; म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..

तुम्हाला जी माहिती मिळाली आहे त्याची सत्यस्थिती पडताळून पाहण्याकरिता तुम्ही तुमच्या शेजारी किंवा मॅनेजर सोबत बोलून प्रॉपर्टी या सोबतच मालक दोघे सुद्धा खरे आहेत की नाही याची पूर्णपणे खात्री करून घ्यावी (Property). एखाद्या वेळी तुमचे शहर सोडून इतर शहरांमध्ये तुम्ही भेट देत असाल तर अशावेळी प्रॉपर्टी तपासून घेऊ शकत नसाल तर या गोष्टीला थोडा विलंब झालेला चांगला.

रेड फ्लॅग;

एखाद्या प्रॉपर्टीच्या मालकाने असा उल्लेख केला तर, म्हणजेच बरेच लोक ही प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या मागे आहेत आणि तुम्ही प्रत्यक्षपणे प्रॉपर्टीला भेट न देता तुमच्यावर टोकन मध्ये देण्याकरिता प्रॉपर्टीचा मालक खूपच दबाव आणत असेल तर अशावेळी जास्त पटीनेच सावध रहा. सर्व बाबी सतत चेक करत रहा. तुमच्या पैशाच्या कोणत्याही नागरिकाला किंवा फसव्या लोकांना फायदा घेऊ देऊ नका.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

पैसे देण्यापूर्वी त्या प्रॉपर्टी चा लीज करार ठोसपणे तयार करा. अशावेळी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसे देत असताना आधी तुमच्याकडे लीज करार असावा. योग्य कायदेशीर कागदपत्रे सादर केल्याशिवाय आगाऊ पैसे मागणाऱ्या लोकांपासून सावध रहा. व्यवहाराच्या ज्या काही अटी असतील त्या स्पष्टपणे देण्यात आलेल्या लीज कराराचा आग्रह सतत मालकाकडे करत रहा. भाड्या विषयी कोणत्याही आर्थिक गोष्टी प्रदान करण्यापूर्वी हा करार करणे गरजेचे असते.

ओळखीची खात्री बाळगा;

अनेकदा फसवणूक करणाऱ्या लोकांकडून आम्ही लष्कराच्या जवान आहोत अशी माहिती सांगितली जाते. ते अशी अट मांडतात की, त्यांची प्रॉपर्टी डायरेक्ट पाहता येत नाही आणि तुम्हाला अशावेळी भेटता सुद्धा येत नाही. असे लोक कित्येकदा आधार कार्ड पॅन कार्ड च्या बनावट ओळखीचा पुरावा दाखवतात (Property Rental Tips). सोबतच अशा प्रकारांमध्ये जोपर्यंत तुम्ही तुमच्या ओळखी विषयी पूर्णपणे खात्री करून देत नाही तोपर्यंत लीज करा करण्याचे टाळा.

Leave a Comment