घर घेताना फसवणूक झाली तर हा पर्याय येईल कामी, पहा कामाची माहिती..!

Property Possession Rules : देशात मालमत्ता विकणाऱ्या बिल्डरांची संख्या मोठी आहे. अनेकजण मोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये काम करतात, तर काही लोक मालमत्ता विकण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करून त्यांचे पैसे हडप करतात. अनेक बांधकाम व्यावसायिक अवाजवी शुल्क आकारतात, ताबा मिळण्यास विलंब करतात. तुम्ही कधी अशा बिल्डरच्या जाळ्यात पडलात का? तुमचे किंवा तुमच्या ओळखीच्या लोकांचे पैसे अडकले आहेत आणि मालमत्ता तुमच्या नावावर होत नाहीये. अशा परिस्थितीत रेरा (RERA) म्हणजेच रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी तुम्हाला मदत करू शकते. (Real Estate).

बिल्डरांच्या मनमानी कारभारावर आता निर्बंध

बांधकाम व्यावसायिकांची मनमानी रोखण्यासाठी, रिअल इस्टेटमध्ये (Real Estate) काम करणाऱ्या कंपन्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी रेरा स्थापन करण्यात आला आहे. घर किंवा फ्लॅट बुक (Flat Booking) करण्याच्या नावाखाली बिल्डर लोकांकडून बुकिंग रक्कम घेतली जाते, अशी अनेक प्रकरणे आतपर्यंत समोर आली आहेत. पैसे भरल्यानंतरही अनेक बांधकाम व्यावसायिक मालमत्तेचे मालकी हक्क देण्यास टाळाटाळ करतात. मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी RERA ची निर्मिती करण्यात आली आहे.

रेरा (RERA) बिल्ट-अप आणि सुपरबिल्ट-अप घर खरेदीदारांकडून बिल्डर्सद्वारे घेतली जाणारी फी आकारण्यास प्रतिबंध करते. बांधकाम व्यावसायिकांच्या मनमानीला आळा बसतो. रिअल इस्टेटमध्ये नियमांचे पालन करणे आणि यंत्रणा सुरळीत चालवणे हा त्याचा उद्देश आहे.

येथे वाचा – काय सांगता! फक्त 18 लाखांत घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात मिळणार्‍या या घरांचा व्हिडिओ..!

बांधकाम व्यावसायिकांनी रेरा कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे.

2016 मध्ये, भारत सरकारने घर खरेदीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी RERA कायदा लागू केला. बांधकाम व्यावसायिकांच्या अन्यायकारक आणि बेकायदेशीर पेमेंटला आळा घालणे हा त्यामागचा उद्देश आहे. जेणेकरून घर खरेदीदारांना मालमत्तेसाठी जास्त किंमत मोजावी लागणार नाही. मात्र आता सर्व बांधकाम व्यावसायिकांनी रेरा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

येथे वाचा – आनंदाची बातमी! या बँकांमध्ये सर्वात स्वस्त गृहकर्ज उपलब्ध, येथे क्लिक करून पहा टॉप दहा बँकांची यादी..!

.

Leave a Comment