बाप रे! घर खरेदी केल्यानंतर फक्त रजिस्टर झालं म्हणून निवांत राहू नका; इथे पण करा नोंद, अन्यथा होईल फसवणूक..!

Property Registration : आपण घर असो की जमीन ही मालमत्ता खरेदी केल्यानंतर तहसीलमध्ये त्याची नोंद झाली की मालक झालो असं समजत असतो. पण मालमत्तेचा खरा मालक होण्यासाठी तहसील नोंदणी केल्यानंतर अजून एका ठिकाणी नोंद करणे गरजेचे आहे. आपन दुकान, प्लॉट किंवा घर याची खरेदी केल्यानंतर समोरील व्यक्तीला म्हणजेच विक्रेत्याला संपूर्ण रक्कम देऊन टाकतो. पण तुम्हाला माहिती आहे का? याची नोंदणी करून देखील तुम्ही त्या मालमत्तेचे (Property) पूर्ण मालक होत नाही. त्याकरिता आपल्याला अजून एका ठिकाणी नोंद करावी लागेल जेणेकरुन पुढील काळात वाद निर्माण होणार नाही.

एका व्यक्तीने त्याची एक मालमत्ता दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना विकल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. विक्रेत्याने विकलेल्या मालमत्तेची खरेदीदाराच्या नावे नोंद केल्यानंतर देखील जमिनीवर लोन (Land Loan) घेतले असल्याची बातमी तुम्ही ऐकली असेल. हे सगळं घडून येतं कारण ज्या व्यक्तीने जमीन खरेदी केली आहे त्याने फक्त नोंदणी केलेली राहते. त्याने त्याची मालमत्ता त्याच्या नावावर केलेली राहत नाही. त्यामुळे मालमत्ता खरेदी करणार्‍याची फसवणूक होण्याची शक्यता असते.

बाप रे! आता 40 लाखांच्या खाली फ्लॅट खरेदी करणे अवघड होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

नोंदणी केल्यानंतर म्‍यूटेशन देखील आवश्यक (Property Registration)

तुम्हाला माहिती आहे का? भारतीय नोंदणी कायद्याच्यानुसार, 100 रुपयांपेक्षा जास्त असलेल्या किमतीच्या मालमत्तेचे (Property) हस्तांतरण झाल्यास ते लिखित स्वरूपामध्ये असावे लागते. त्याची नोंदणी उपनिबंधक कार्यालयामध्ये करण्यात येते. हा नियम संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आलेला आहे आणि त्याला नोंदणी म्हटलं जातं. पण फक्त नोंदणी केल्याने तुम्ही घर, जमीन आणि दुकानाचे पूर्ण मालक होत नाही. नोंदणी केल्यानंतर म्यूटेशन करणे हे देखील खूपच महत्वाचे असते. हे लक्षात ठेवा..

मुंबईत याठिकाणी मिळणार बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

नोंदणी केली म्हणून शांत बसू नका

रजिस्ट्री हा फक्त मालकी हस्तांतरणाचा दस्तऐवज आहे. मालकीचा नाही, हे लक्षात घ्या. म्हणूनच मालमत्तेची नोंदणी केल्यानंतर तुम्ही त्या नोंदणीच्या आधारे म्यूटेशन करुन घेणे गरजेचे आहे. तेव्हा तुम्ही त्या मालमत्तेचे पूर्णपणे मालक बनाल. त्यामुळे फक्त रजिस्ट्री किंवा नोंदणी करून निवांत बनू नका तर म्यूटेशन केल्यानंतरच निवांत व्हा. ही माहिती महत्वाची वाटल्यास आपल्या लोकांना जास्तीत जास्त शेअर करा…

दिवाळीला संधीचं सोनं करा; ठाण्यात घ्या फक्त 11 लाखात घर, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment