काय सांगता! ९९ वर्षांनंतर राहणार नाही तुमचा फ्लॅट? काय आहे हा विचित्र नियम, पहा अनुभवी लोकांचा सल्ला..!

Real Estate : मागील कित्येक वर्षांपासून देशभरामध्ये फ्लॅटची (Flat) खरेदी विक्री अगदी जोमात वाढली आहे. तरीही जास्तीत जास्त लोकांना जमिनीवर असलेले घर विकत घ्यायला आवडत आहे. परंतु सध्याच्या वाढत जाणाऱ्या महागाई कडे बघितले तर जमीन खरेदी करून त्या जमिनीवर घर बांधणे फारच कठीण झाले आहे. अशावेळी बजेटची कमतरता असल्यामुळे कित्येक लोक फ्लॅट खरेदी कराचा विचार करतात (Property update today). परंतु तुम्हाला हे माहित आहे का? अनेक फ्लॅट हे लीजहोल्ड प्रॉपर्टी मध्ये असतात. तुम्ही या माध्यमातून फ्लॅट खरेदी केला तर तुमच्याकडून 99 वर्षानंतर ही प्रॉपर्टी परत घेतली जाते. या कारणास्तव तुम्ही अनेकदा अनेक लोकांचे असे म्हणणे ऐकली असेल की, फ्लॅट खरेदी करण्याऐवजी स्वतःचे घर किंवा फ्लॅट घेणे फायद्याचे ठरेल.

लीजहोल्ड आणि फ्रीहोल्ड मधील फरक-

मित्रांनो तुम्ही विकत घेणारा फ्लॅट नक्की कसा आहे? म्हणजेच तुमच्या भावी पिढीसाठी हा फ्लॅट वापरता येईल की 99 वर्षानंतर हा फ्लॅट तुमच्या भावी पिढीकडून परत घेतला जाईल (real estate news). म्हणजेच तुम्ही विकत घेणारा फ्लॅट हा लीजहोल्ड आहे की फ्रीहोल्ड आहे याबद्दल आज आपण तपशील माहिती जाणून घेऊया.

बाप रे! घर विकत घेण्यासाठी लोकांनी लावली रांग; घराची किंमत पाहून उडतील हौश..!

फ्रीहोल्ड मालमत्ता म्हणजे काय?

फ्री होल्डर मालमत्ता (Freehold Property) बघितली तर कोणतीही रियल इस्टेट मालमत्ता असो त्या मालमत्तेवर त्या मालमत्तेच्या मालकीचाच हक्क असतो इतर कोणाचा हक्क नसतो अशा मालमत्तेला फ्रीहोल्ड मालमत्ता म्हणतात. ही मालमत्ता विकल्यानंतर जुन्या मालकीचा किंवा जुन्या मालकीच्या वंशांचा त्या मालमत्तेवर अजिबात हक्क राहत नाही. ती मालमत्ता पुढील खरेदी धारकाच्या वतीने वडिलोपार्जित मालमत्ता बनते. सहसा फ्री होल्ड मालमत्ता महागच असते. परंतु तुम्ही एकदा याची खरेदी केली तर ती कायमस्वरूपी तुमची बनते..

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? पहा कामाची माहिती..!

लीजहोल्ड प्रॉपर्टी म्हणजे काय?

तुम्ही जर लीजहोल्ड प्रॉपर्टी (Leasehold Property) खरेदी केली असेल तर काही ठराविक कालावधीसाठी ती तुमची असते. सहसा बघितले तर भाडेपट्टी 30 किंवा 99 वर्षांची असते. तिथून पुढे मालमत्तेचा जो मूळ मालक आहे त्याच्याकडे परत केली जाते. कालावधी संपूर्ण झाल्यानंतर त्याची भाडेपट्टी ज्या त्या कालावधीनुसार पुन्हा वाढवली जाऊ शकते. तसेच याची आपण फ्री होल्ड मालमत्तेमध्ये रूपांतरण सुद्धा करू शकतो. त्यासाठी परत पुन्हा जास्तीचे शुल्क भरावे लागतील. लीज होल्ड मालमत्तेचे जे काही मूल्य असेल ते लीज संपल्यानंतरच घसरते. कारण की ती मालमत्ता खरेदी करणाऱ्या व्यक्तीची कायमस्वरूपी नसते. म्हणूनच ही मालमत्ता फ्री होल्ड मालमत्तेपेक्षा स्वस्त असतो.

अरे व्वा! आता तुम्ही देखील घेऊ शकता 1 कोटीचे घर..फक्त वापरा ही ट्रिक..!

अनुभवी लोक फ्लॅटऐवजी स्वतंत्र घर घेण्याचा सल्ला का देतात?

वडीलधारी व्यक्ती तसेच अनुभवी लोक नेहमी फ्री होल्ड मालमत्ता घेण्याचा सल्ला देतात. कारण की यामागे सर्वात प्रथम लीज होल्ड मालमत्ता कारणीभूत आहे. कारण की लीज होल्ड मालमत्तेची किंमत ही कमी असते. अशावेळी बांधकाम व्यवसायिक 99 वर्षाच्या भाडेतत्त्वावर अशी जमीन खरेदी करतात आणि तिथून पुढे जी काही जमीन असेल ती मूळ मालकाकडे परत केली जाते. अशा परिस्थितीमध्ये त्या फ्लॅटमध्ये जे लोक राहत आहेत. त्यांना अडचण येऊ शकते. जमीनदार मालकीची इच्छा असेल तर तो इमारत देखील पाडू शकतो. लीज होल्ड प्रॉपर्टी खरेदी धारकांची किंवा वापरकर्त्यांची चांगलीच धावपळ होऊ शकते. त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा फ्री होल्ड प्रॉपर्टी खरेदी करायचा.

टू-बीएचके घरांची जोरदार खरेदी; या भागाला लोकांची विशेष पसंती..पहा कामाची बातमी..!

Leave a Comment