काय सांगता! पुण्यात म्हाडाची स्वस्त घरे उपलब्ध होणार? पुन्हा स्वस्तात घर घेण्याची संधी, पहा संपूर्ण बातमी..!

Pune Mhada Flats : पुणे म्हाडाला परवडणारी घरे बांधण्यासाठी पुण्यामध्ये जागा मिळत नाहीये. त्यामुळे म्हाडाने नव्या जागांचा शोध सुरू केला असून, पुण्यासह सातारा, सांगली तसेच कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील महसूल खात्याच्या ताब्यात असलेली सुमारे 70 हेक्टर जागेची मागणी केली आहे. यासंदर्भात संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली असून, सकारात्मक अहवाल आल्याच्यानंतर सरकारला यासंदर्भात प्रस्ताव पाठविला जाणार आहे. त्यासाठी आता ‘म्हाडा’च्या पुणे विभागाकडून हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे.

Pune Mhada Flats

‘म्हाडा’ला घरे उभी करण्यासाठी पुण्यात जागा उपलब्ध होत नाही. म्हणून ‘म्हाडा’ने एप्रिल महिन्यात पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट असलेल्या 23 गावांसोबत नागरी जमीन कमाल धारणाच्या माध्यमातून तसेच पुणे महागनर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) जमिनी मिळविण्याकरिता प्रयत्न सुरू केला आहे. यासंदर्भात त्यांच्याकडे चाचपणी सुरू केली आहे. या संदर्भात एप्रिल महिन्यात सर्वात अगोदर ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वृत्त देऊन ‘म्हाडा’च्या या मागणीकडे लक्ष वेधले होते.

म्हाडाचं सर्वात मोठं घर डोंबिवलीत; अर्ध्या किंमतीत घर मिळणार? येथे क्लिक करून पहा बातमी..

अलीकडच्या काळात घरांच्या किमती वाढल्या आहेत, तर अनेकांना मुंबई – पुणे या शहरांमध्ये घर (1 bhk flat Mumbai) घेण्याची इच्छा असून देखील जास्त किमत असल्यामूळे सामान्य नागरिक घर घेऊ शकत नाही. यामुळे म्हाडाच्या घरांची खूपच मागणी वाढली आहे. मागील काही वर्षांमध्ये ‘म्हाडा’ने सोडतींच्या माध्यमातून जवळपास 40 हजार सदनिकांचे पुणे विभागामध्ये वितरण केले आहे.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? पहा कामाची माहिती..!

‘म्हाडा’च्या परवडणाऱ्या घरांचा (Mhada Affordable Flats) सामान्यांना आधार आहे. ‘म्हाडा’ने आजपर्यंत पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे, सांगली सातारा आणि कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये इमारती उभ्या करून जण सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. आतापर्यंत म्हाडाने पुण्यामध्ये बिबवेवाडी, खराडी, कोंढवा, चिंचवड, येवलेवाडी, धानोरी, बाणेर, मोरवाडी, वाकड, मोशी, पिंपळेनिलख इत्यादी ठिकाणी घरे उभारली आहे. पुणे तसेच पिंपरी-चिंचवड भागांमध्ये ‘म्हाडाच्या प्रकल्पांसाठी फारशा जागा उपलब्ध नसल्याची माहिती ‘म्हाडा’कडून देण्यात आली आहे. या अगोदर ‘म्हाडा’ने पुण्यातील समाविष्ट गावांमधील पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे (PMRDA) मागणी केली होती.

मुंबईत याठिकाणी मिळणार बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

सध्याच्या काळात ‘म्हाडा’कडे पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुमारे 15 हेक्टर एवढी जागा आहेत. यातील काही जागांवर आरक्षण असून, काही जागा विकसित केल्या जात आहे. हे लक्षात घेऊन ‘म्हाडा’ने नव्या जागांचा शोध सुरू केला आहे. याकरिता पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे महसूल खात्याकडील जागेची मागणी करण्यात आली असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.

बाप रे! ठाण्यातील म्हाडाची घरे झाली महाग; येथे क्लिक करून पहा किती लाखांनी वाढवली किंमत..!

Leave a Comment