पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज : शेतकर्‍यांना दिला महत्वाचा सल्ला, पहा 25 जून पर्यंतचा अंदाज..!

पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज 2022

Read Marathi Online : बर्‍याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला मॉन्सून अखेर तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात पोहोचला. आणि बळीराजाचा आनंद दुप्पट झाला कारण आता गरमीच्या उकाड्या पासून सुटका मिळणार आहे आणि त्यातच शेतीची कामे सुरू होऊन बळीराजाच्या हाताला देखील काम मिळणार आहे.

कोकण भागात मॉन्सून (Monsoon) 10 तारखेला पोहोचला असल्याचं हवामान खात्याने जाहीर केलं होतं. एका दिवसात म्हणजेच 11 जून रोजी मॉन्सून कोकणातून मुंबईमध्ये आले असल्याची देखील माहिती हवामान विभागाकडून मिळाली आहे. आता मुंबईकरांना उकाड्या पासून नक्कीच दिलासा मिळाला आहे. इथून पुढे मॉन्सूनच्या प्रगतीत कुठल्याही प्रकारची अडचण येणार नसल्याचीही माहिती देण्यात आलेली आहे. त्यामूळे शेतकर्‍यांच्या पेरणी काळात काही समस्या येणार नाही असं वाटतय..

येथे वाचा  – सोयाबीनचे हे वाण बनवतील मालामाल; पहा सोयाबीनचे 5 जबरदस्त वाण..!

अशातच आता शेतकर्‍यांचे आवडते हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjab Dakh Latest Havaman Andaj) यांनी जून महिन्याचा अंदाज स्पष्ट केला आहे. बर्‍याच दिवसांपासून शेतकरी त्यांच्या अंदाजाची वाट पाहत होते. अखेर त्यांनी 11 जून रोजी 25 जून या तारखेपर्यंतचा हवामान अंदाज व्यक्त केला आहे. त्यामूळे आता शेतकर्‍यांचे मॉन्सून (Monsoon) बद्दलचे गैरसमज दूर होणार आहेत. त्यांनी अंदाज व्यक्त करत असताना शेतकर्‍यांना पेरणी संदर्भात एक महत्वाचा सल्ला देखील दिला आहे. जो सर्व शेतकर्‍यांनी जाणून घेण महत्त्वाचं आहे.

त्यांनी पुढे अधिक माहिती देताना सांगितले की राज्यातील अनेक ठिकाणी 11 जून ते 15 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. तसेच त्यांनी 16,17 जून यादरम्यान मराठवाड्यात जोरदार पाऊस होणार असल्याचं देखील म्हटलं आहे. त्यामूळे मराठवाड्यातील शेतकर्‍यांनी काळजी घ्यावी..

येथे वाचा  – कापसाचे हे टॉप १० बियाणे (वाण) तुम्हाला बनवतील लखपती..!

तसेच त्यांच्या मते येत्या 25 तारखेपर्यंत मॉन्सून संपूर्ण देशभरात पसरणार आहे. यादरम्यान शेतकरी बांधव पेरणीची कामे आटोपून घेतील. असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. 18 जून ते 22 जून या कालावधीत पेरणी करण्यासाठी योग्य पाऊस असेल असं देखील त्यांनी भाकित केलं आहे.

पंजाब डख यांचा शेतकर्‍यांना सल्ला

पेरणी करण्यासंदर्भात बर्‍याच भागात शेतकर्‍यांची चढाओढ सुरू झाली आहे. सर्वांनाच पटापट पेरणी करून मोकळे व्हायचं आहे. पण अशा परिस्थितीत पंजाबराव डख यांनी दिलेला सल्ला खूप मोलाचा ठरणार आहे.

येथे वाचा – सोयाबीनची बीज प्रक्रिया अशा पद्धतीने करून भरघोस उत्पादन मिळवा..!

पेरणी करत असताना आपल्या जमिनीची ओल तपासूनच पेरणी करावी. जमिनीतील ओल न बघता पेरणी केल्यास शेतकर्‍यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे पेरणी दरम्यान ओल तपासण्याचा महत्वाचा सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे. त्याच बरोबर गुणवत्तापूर्ण/दर्जेदार बियाणे वापरण्याचाही सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे…

हवामान अंदाज, चालू बाजार भाव आणि शेती विषयक महत्त्वाच्या माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…