राज्यात पुन्हा पाऊस : ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका, हवामान विभागाने वर्तवला अंदाज..!

मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण आहे, त्यामूळे राज्यातील तापमानात घट झाली आहे. उन्हामुळे त्रस्त झालेल्यांना या ढगाळ वातावरणात फिरण्याचा आनंद घेता येणार आहे. पण हीच बातमी शेतकरी राजाची चिंता वाढवणारी आहे. (Rain again in the state : This districts will be hit, forecast by the meteorological department)…

हे पण वाचा

गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपिटीमूळे नुकसान सहन करत असलेल्या शेतकरी बांधवांचे रब्बी पिके अजून देखील शेतात आहे. मोठ्या प्रमाणात पिकांची काढणी झालेली आहे, पण ज्या शेतकर्‍यांचे पीक शेतात आहे अशा शेतकर्‍यांच्या चिंतेमध्ये पुन्हा वाढ झाली आहे कारण हवामान विभागाने आज काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मेघ मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने काळजी घेण्याच आवाहन बळीराजाला केलं आहे. यामध्ये नेमकं कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे हे आपण बघणार आहोत.

‘या’ जिल्ह्यांना बसणार पावसाचा फटका

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे, यामध्ये कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे, येथे आज हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे तर उद्या सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये हलका ते मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या पावसापासून शेतकर्‍यांचं नुकसान होऊ नये म्हणून हवामान विभागाने काळजी घेण्याचं आवाहन शेतकर्‍यांना केलं आहे.

शेतमालाचे बाजार भाव, हवामान अंदाज, कृषी योजना आणि शेती विषयक सर्व माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

Leave a Comment