शेतकर्‍यांनो ! पाऊस आला रे आला, पहा महाराष्ट्रात मॉन्सून कधी?

Read Marathi Online : भयानक गरमी पासून कंटाळलेले आता मॉन्सूनच्या आगमनाच्या प्रतिक्षेत आहे. अशा नागरिकांना आता लवकरच गरमी पासून सुटका मिळणार आहे. कारण मॉन्सून सोमवारी अंदमानात तर दाखल झालाच पण येत्या काही दिवसातच म्हणजेच 25 ते 27 मे दरम्यान मॉन्सून केरळ मध्ये दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (The rain is coming soon, See when is the monsoon in Maharashtra?)

मॉन्सून पुढील दोन ते तीन दिवसात संपूर्ण अंदमान बेटांवर आणि बंगालच्या उपसागरात पोहोचेल असा अंदाज आहे. यावर्षी मॉन्सूनचे आगमन लवकर झाल्यामुळे पेरणीची कामेही लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे.

येथे वाचा – सोयाबीन बियाणे महागण्याची शक्यता, पहा किती रुपयांनी महागणार बियाणे..!

हवामान विभागाच्या माहितीनुसार मॉन्सूनसाठी (Monsoon) सर्व वातावरण अनुकूल असल्यामूळे मॉन्सून खूपच जोरात येत आहे. एकदा का मॉन्सून केरळ मध्ये आले की त्याला महाराष्ट्रात येण्यासाठी खूप दिवस लागणार नाही अशीही माहिती मिळाली आहे. त्यामूळे आता पेरणीसाठी शेत तयार करण्याच्या कामाला वेग आल्याचं पाहायला मिळतय. यावर्षी 99 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामूळे कोरडवाहू शेतकर्‍यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

येथे वाचा – कापूस उत्पादक शेतकरी होणार मालामाल, यंदाही कापसाचे भाव तेजीतच राहण्याची शक्यता..!

मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. आणि राज्यात पुढचे तीन दिवस देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. या मॉन्सूनपूर्व पावसाने थोड्या प्रमाणात का होईना पण तापमानात थोडी घट होण्याची शक्यता वाटत आहे..

ताजे हवामान अंदाज अपडेट मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा..

Leave a Comment