संधीचं सोनं करण्याची वेळ! नवी मुंबईतील या भागात प्रॉपर्टीचे भाव दुप्पट होणार; पहा तज्ञ काय म्हणतात..!

Real Estate Navi Mumbai : सिडको करत असलेल्या दर्जेदार कामामुळे लोकांमध्ये सिडकोची चर्चा नेहमी होताना दिसून येते. सध्याच्या काळामध्ये सिडको नवी मुंबईत (Cidco Navi Mumbai) तब्बल 345 एकरावर खारघर इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्कची (Kharghar International Corporate Park) उभारणी करत आहे. मागील बर्‍याच काळापासून सरकारकडून नवी मुंबईतील मध्यवर्ती 345 एकर एवढी जमीन (Land Navi Mumbai) पडून ठेवण्यात आली होती. पण येथे भविष्यात काही तरी मोठा प्रोजेक्ट उभा होईल अशी कल्पना लोकांना होती. आता सध्या येथे विविध प्रोजेक्ट सुरु झाल्याने रिअल इस्टेट क्षेत्रात (Real Estate Navi Mumbai) गुंतवणूक करण्यासाठी नवी मुंबईतील गुंतवणूकदार समोर आले आहेत. त्यामुळे पुढील 2 वर्षांमध्ये नवी मुंबईमधील जमीन, फ्लॅट इत्यादी प्रॉपर्टीचे भाव दुप्पट होतील का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

नवी मुंबईतील प्रॉपर्टीचे भाव कशामुळे वाढणार? (Navi Mumbai Property)

अनेक वर्षांंपासून नवी मुंबईमध्ये असलेले नवी मुंबई इंटरनॅशन एअरपोर्टचे काम थांबलेल्या अवस्थेत होते. पण 2016-17 या वर्षांत या एअरपोर्टच्या कामाला काही प्रमाणात गती भेटली होती. पण दरम्यानच्या काळामध्ये सिडकोचे प्रलंबित असलेले प्रकल्प सगळ्यात आधी पूर्ण करण्यात यावे असा निर्णय घेतला गेला, या कारणामुळे हे काम समोर ढकलण्यात आलं. त्यात पुन्हा पुढील काळात कोरोनाचे संकट ओढवल्यानंतर परत या कामाला ब्रेक लावण्यात आला. पण आता अलीकडच्या काळामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले असून आता एरपोर्टच्या कामाला गती मिळालेली दिसत आहे. त्यामुळे हे लक्षात घेता असे दिसते की येत्या काही वर्षातच नवी मुंबईतील प्रॉपर्टीचे (Navi Mumbai Property) भाव वाढण्याची शक्यता आहे.

फक्त एवढे पैसे भरा आणि पुण्यात म्हाडाचा फ्लॅट घ्या; फक्त येथे करा एक कॉल..!

पहा खारघर इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क काय आहे?

एका वेबसाईट वर मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबई एअरपोर्ट जवळील भागामध्ये एक विशेष इकॉनॉमिक झोन बनवण्यात येणार आहे. म्हणून सरकारने या कामासाठी अनेक वर्षांपासून 345 एकर एवढी जमीन राखीव ठेवली होती. आता सिडकोद्वारे नवी मुंबईमध्ये मध्यवर्ती भागातील मोठ्या भूभागावर खारघर इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क बनवण्यात येणार आहे. येथे असलेले सर्व प्लॉट (Cidco Plots Navi Mumbai) सिडकोचे आहे आणि सिडकोद्वारे हे प्लॉट लीझवर विविध कंपन्यांना देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष बाब अशी की हे खारघर कॉर्पोरेट पार्क बनवत असताना पार्कला जास्तीत जास्त आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये नैसर्गिक वातावरण ठेवण्यात येणार आहे. यामध्ये झाडे आणि हिरवळ टिकून ठेवण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. सोबतच विस्टा, प्लाझा आणि कॉम्युनिटी सेंटर याकडे देखील लक्ष देण्यात येणार आहे.

सर्वात विशेष म्हणजे जलद मानली जाणारी वाहतूक व्यवस्था याठिकाणी केली जाणार आहे. मेट्रो आणि BRT बस सुविधा (Metro Service) या महत्त्वाच्या सुविधा असणार आहे. हे पाहता येणार्‍या काळामध्ये नवी मुंबईमधील प्रॉपर्टीचे भाव वाढण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

आता मुंबईत सरकारी योजनेतून मिळवा प्लॉट; येथे क्लिक करून पहा किंमती आणि लोकेशन..!

नवी मुंबईत सिडकोचे अनेक प्रकल्प

नवी मुंबईचा आर्थिक विकास साधण्यासाठी सिडकोद्वारे अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. त्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प, न्हावा, कोस्टल रोड, जेएनपीटी आणि शिवडी सी लिंक याचा समावेश आहे. सिडकोच्या माध्यमातून खारघर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्फ कोर्स उभारण्यात आले आहे. मेट्रो तसेच BRT बस यासारख्या फास्ट असलेल्या वाहतूक सुविधा निर्माण होत असल्यामूळे येत्या काही वर्षांमध्ये नवी मुंबईमधील प्रॉपर्टीचे भाव दुप्पट होण्याची शक्यता असल्याचं मत अभ्यासकांनी वर्तविले आहे.

Leave a Comment