काय सांगता! भाडेकरू घेऊ शकतो घराचा ताबा, म्हणून घर मालकाने करा फक्त हे एक काम..!

Rent Agreement Rule : अनेकवेळा घरमालक आणि भाडेकरू यांच्यात वाद होताना आपल्याला दिसतात. यामध्ये काही घरमालक असे असतात, त्यांना वेळेवर घर भाडे मिळत असल्याने ते त्यांच्या घराकडे ढुंकूनही पाहत नाही, असे आपल्याला दिसून येते. कारण त्यांना फक्त भाडे पाहिजे असते. पण अलीकडे अशी देखील काही प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात भाडेकरू घर मालकाने घर रिकामे करायला सांगितल्यावर स्पष्टपणे नकार देतात. आम्ही येथे बर्‍याच काळापासून राहतो असं भाडेकरू सहसा सांगतात. काही भाडेकरू तर घरमालकाला नियम आणि कायदे समजून सांगतात.

जर तुमच्या जागेत कोणी भाड्याने राहत असेल किंवा तुम्ही भाडेकरू म्हणून दुसर्‍याच्या जागेत राहत असाल तर तुम्हाला हा नियम माहिती पाहिजे. जर एखादा व्यक्ती घरामध्ये 10 वर्षांपासून राहत असेल तर घरमालक त्याला घर सोडायला सांगू शकतो की नाही? आणि जर भाडेकरूंनी घर सोडले नाही तर तुम्हाला काय कारवाई करता येऊ शकते? याबाबत महत्वाची माहिती जाणून घेऊ..

येथे वाचा – चिंता नको! होम लोनचा हप्ता भरता येत नसेल तर हा पर्याय येईल तुमच्या कामी, येथे क्लिक करून पहा माहिती..

पहा काय आहे लिमिटेशन ॲक्ट 1963..

भाडेकरूला मिळू शकतो घराचा ताबा : लिमिटेशन ॲक्ट 1963 या कायद्यात घरमालक आणि भाडेकरू याच्या संदर्भात नियम आहे. हा कायदा खाजगी मालमत्तेवर असलेला मर्यादेचा वैधानिक कालावधी 12 वर्षे आहे, असं सांगतो. तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की या कालावधीला ताब्याचा दिवस म्हटले जाते, त्यामुळे या नियमामूळे निर्णय भाडेकरूच्या बाजूने लागण्याची शक्यता असते. 

येथे वाचा – स्वस्तात घर पाहिजे? म्हाडाच्या या घरांसाठी लवकरच जाहिरात; येथे क्लिक करून पहा बातमी..

घर मालकाने काय करावे?

घरमालकाच्या काही निष्काळजीपणामुळे भाडेकरू घर ताब्यात घेऊ शकतो. त्यामुळे भाडेतत्वावर घर देत असताना भाडेकरूकडून भाडेकरारावर स्वाक्षरी करायला विसरू नका.. याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागेल. घर किंवा दुकान भाड्याने देत असताना सर्वात प्रथम भाडे करार तयार करा. हा करार 11 महिन्यांचा करावा, त्यानंतर तुम्हाला दर 11 महिन्यांनी त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. अभ्यासकांच्या मते जर तुम्ही असे केले तर तुमच्या घराचा ताबा कोणालाही घेता येणार नाही. तसेच, तुम्ही तुमची मालमत्ता भाड्याने दिल्याचा हा पुरावा आहे.

येथे वाचा – घर घेताना फसवणूक झाली तर हा पर्याय येईल कामी, पहा कामाची माहिती..!

Leave a Comment