मोदी, राजीनामा द्या असा हॅशटॅग ट्‌वीटरवर ट्रेन्डींग; #ResignModi

दिल्ली : तामिळनाडूतील एका व्यक्तीने सुरू केलेला #ResignModi म्हणजेच नरेंद्र मोदी राजीनामा द्या असा हॅशटॅग ट्‌वीटरवर ट्रेन्डींग मध्ये आला आहे. आज(दि.19 एप्रिल) सकाळ पासून हा हॅशटॅग चांगलाच गाजत आहे. या हॅशटॅग चा वापर करुन अनेकांनी नरेंद्र मोदींवर टीकेचा पाऊस सुरू केला आहे. देशातील परिस्थिती खुप भयानक असतांना आपले पंतप्रधान काहीच करत नाहीये. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये राजकीय सभा घेण्यात व्यस्त आहे असे सांगत अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया या हॅशटॅगवर व्यक्त केल्या आहे.

देशामध्ये कोरोनाची परिस्थिती खुप भयंकर आहे. देशांत बहुतांश राज्यांत बेड्स, ऑक्‍सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळतय. रुग्णांचे हाल होत आहे. दरम्यान हॅशटॅगचा वापर करत अनेकांनी आपल्या मनातील संताप व्यक्त केला आहे. काहींनी हॅशटॅग लावून कार्टून अपलोड केली आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करतांना दिसत आहे आणि त्यांच्या समोर भाषण ऐकणारे सर्व मृत लोक दिसत आहे.

https://twitter.com/Pathak_Nil01/status/1384012074016116736

काहींच्या मते या उद्भवलेल्या परिस्थितीला मोदी जबाबदार आहे. काहींनी तर मोदींना पंतप्रधानपदी बसण्याचा नैतिक हक्क उरलेला नाही, असेही म्हटले आहे. अशा प्रकारे मोदींवर टीका करत अनेकांनी आपल्या मनातील रोष व्यक्त केला आहे.

लॉकडाउनची जबाबदारी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी राज्यांच्या सरकारांवर सोपवली आहे. पंतप्रधान फक्त आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये व्यस्त आहे, पंतप्रधानांचे देशात अस्तित्व दिसत नसल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, असा ट्रेंड सध्या ट्‌वीटरवर पहायला मिळतोय.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment